Homeमनोरंजनआयफोन, वनप्लपेक्षा कमी किंमत आणि दमदार फिचर्स, लॉंचआधीच Nothing फोन चर्चेत!

आयफोन, वनप्लपेक्षा कमी किंमत आणि दमदार फिचर्स, लॉंचआधीच Nothing फोन चर्चेत!


काहीही फोन 3: परवडणाऱ्या किंमतीत आयफोन, वनप्लसशी स्पर्शा करणारा फोन शोधत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. लवकरच नथिंग फोन बाजारात येतोय, ज्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत दमदार फिचर्स मिळणारेयत. कंपनीने नथिंग फोन 3 च्या लाँचिंग तारखेची अधिकृतपणे जाहीर केलीय. नथिंगचा हा फोन जुलैमध्ये लाँच होईल. 2023 मध्ये कंपनीने फोन 2 लाँच केला होता. यानंतर कंपनी या मालिकेतील फ्लॅगशिप फोन लाँच करण्याची तयारी करतेय. गेल्यावर्षी कंपनीने नथिंग फोन (2a) मालिका लाँच केली. गेल्या महिन्यात Nothing ने जागतिक स्तरावर फोन (3a) सिरिज लाँच केली होती. नथिंग फोन 3 मध्ये काय फिचर असणार? किती किंमत असणार? सविस्तर जाणून घेऊया.

खास फिचर्स

नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये एक मोठा अपग्रेड दिसून येतोय. या फोनच्या मागील बाजूस OnePlus 12 सारखा गोलाकार कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. आयकॉनिक ग्लिफ इंटरफेस फोनच्या मागील बाजूस असून यातून युजर्सला कॉल, मेसेज आणि इतर सूचनांबद्दल अलर्ट मिळतील. या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले असू शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याच्या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 3 हजार निट्स पर्यंत असेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसरसह येऊ शकतो. यात 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असू शकते. या फोनमध्ये 5 हजार एमएएच बॅटरी आणि 20 वॅट वायरलेस फास्ट चार्जिंग फीचरसह 20 वॅट वायर्ड देखील मिळू शकते. यात सर्कल-टू-सर्च, स्मार्ट ड्रॉवर, व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन आणि बिल्ट-इन एआय असिस्टंट सारखी एआय चालित फिचर्स असू शकतात. नथिंग फोन 3 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. त्यातील तिन्ही कॅमेरे 50 मेगापिक्सेलचे असतील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लाँच तारीख निश्चित

या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या अधिकृत X हँडलवरून त्याच्या लॉन्च तारखेबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. असे असले तरी जुलै 2025 मध्ये फोन लॉंच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने 6 सेकंदांचा टीझर व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये क्रमांक 3 दिसतोय. पोस्टनुसार हा फोन 3 जुलै 2025 रोजी लाँच होईल. अलीकडेच कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी त्याच्या किंमतीबद्दल माहिती दिली होती.

नथिंग फोन (3a) ची किंमत आणि ऑफर्स

फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज असलेल्या नथिंग फोन (3ए) मॉडेलची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 3 हजार रुपयांची सवलत मिळू शकते. या सर्वानंतर फोनची अंतिम किंमत 24 हजार 999 रुपये असेल. तुमचा जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन तुमचे 10 हजार रुपये वाचू शकतात. ऑफरचा जास्तीत जास्त फायदा तसेच एक्सचेंज केल्या जाणाऱ्या फोनच्या मॉडेल आणि सध्याच्या स्थितीवर तुमचा डिस्काऊंट अवलंबून असतो.

वनप्लस नॉर्डशी होतेय तुलना

नथिंग आणि वनप्लस या दोन्ही फोनमध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह 6.77-इंचाचा मोठा डिस्प्ले असू शकतो. नथिंगच्या फोनमध्ये LTPO AMOLED पॅनेल आणि 3,000 निट्स पर्यंत ब्राइटनेस असू शकतो, ज्यामुळे स्क्रीन सूर्यप्रकाशातही सहज दिसते. Nothing चा नवीन फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह येऊ शकतो, ज्यामध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज असू शकते. तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9400ई प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. जी डायमेन्सिटी 9400 ची हलका आवृत्ती आहे. यात 16 जीबीपर्यंत रॅम आणि नवीनतम अँड्रॉइड 15 असू शकते. नथिंग फोन 3 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यामध्ये 50 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 32 एमपी सेल्फी कॅमेरा फ्रंटला असू शकतो. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा ओआयएससह, 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!