Homeदेश-विदेशपाकिस्तान दिल्ली श्रीनगर फ्लाइट नवीनतम अद्यतनाने अशांततेस नकार दिला.

पाकिस्तान दिल्ली श्रीनगर फ्लाइट नवीनतम अद्यतनाने अशांततेस नकार दिला.


इंडिगो इमर्जन्सी लँडिंग: मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. जिथं उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या राज्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर या हवामानाचा थेट परिणाम होत असून, एका अतिशय भीषण प्रसंगाचा व्हिडीओ याचदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला. थोडक्यात संकट टळलं अथवा अनर्थ झाला असता हेत समोर आलेलं दृश्य पाहताक्षणी अनेकजण म्हणाले. हा प्रसंग होता इंडिगोच्या विमानाच्या आपात्कालीन लँडिंगचा.

मृत्यू दाखवणारा प्रवास…

दिल्लीहून श्रीनगरला (Delhi to Srinagar Flights) जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E2142 मध्ये त्या क्षणी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली, जेव्हा अचानकच वातावरण बिघडलं, विमान वादळात सापडलं आणि वीजांच्या कडकडाटानं विमानालाही हादरा बसला. प्रवास करणाऱ्या 220 प्रवाशांनी किंकाळ्या ठोकल्या, देवाचा धावासुक्धा केला. या प्रसंगी सर्व नियंत्रण वैमानिकाच्या हाती असल्यानं प्रसंगावधान राखत त्यानं एअर ट्रॅफिक कंट्रोककडून काही वेळासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्प अर्थात एअरबेसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या एअरबेसनं मात्र भारतीय वैमानिकाची ही विनंती धुडकावून लावली. ज्यानंतर आता नागरी उड्डयन महानिदेशालय (डीजीसीए) उड्डाण क्रमांक 6E 2142 सोबत घटलेल्या या दुर्घटनेची चौकशी करत आहे. या विमानानं काही नेत्यांसह जवळपास 220 प्रवासी एकाच वेळी प्रवास करत होते.

विमानाचं उड्डाण झालं मात्र, अचानक गारपीट, पाऊस सुरू झाल्यामुळं वैमानिकानं श्रीनगरच्या विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमला ‘इमरजंन्सी’ घोषित करण्याच्या सूचना केल्या आणि बुधवारी हे विमान अतिशय सुरक्षितरित्य धावपट्टीवर लँड करण्यात आलं. अमृतसरवरून उड्डाणासमयी वैमानिकाला खराब हवामानामुळं एकाएकी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये वैमानिकानं तातडीनं लाहोर एअर ट्रॅफिक रुमकडे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रामध्ये जाण्याची परवानगी मागितली. मात्र लाहोर एटीसीनं ही विनंती स्वीकारली नाही.

ही परवानगी न मिळाल्यानं नाईलाजानं वैमानिकाला मूळ उड्डाणपथावरच टिकून रहावं लागलं आणि परिणामी गंभीर परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला. जिथं विमानावर वीज कोसळून विमानाच्या पुढील टोकापाशी असणाऱ्या भागाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. वैमानिकानं अतिशय सावधगिरीनं इमरजंन्सी लँडिंग करत सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्याम पहलगाम हल्ला, त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर या सर्व परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण नात्यातील तेढ आणखी वाढली. ज्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आणि भारतानं पाकिस्तानधील विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!