Homeपुणे / पिंपरी-चिंचवडLocal BJP leaders are trying to inaugurate the statue भाजप नेत्यांचे प्रयत्न

Local BJP leaders are trying to inaugurate the statue भाजप नेत्यांचे प्रयत्न


नांदेड : रामटेकच्या संस्कृत विद्यापीठातील माजी पंतप्रधान, भारतरत्न पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणात अनास्था दाखविणाऱ्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या येथील पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे काही प्रमुख नेते येत्या सोमवारी नांदेडमध्ये येत आहेत. शहा आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची आखणी पक्षाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वासह संपूर्ण नियंत्रणाखाली येथे होत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ द्यावा, असे त्यांच्या कार्यालयाला कळविण्यात आले होते, पण बुधवारी दुपारी आलेल्या गृहमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमात पुतळ्याच्या अनावरणाचा सुस्पष्ट उल्लेख नसल्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल मनपा प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे.

रामटेकच्या विद्यापीठातील नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरळसरळ नकार दिला होता. तर विद्यापीठाने विनंती करूनही विदर्भातील सत्ताधारी नेत्यांनी या कार्यक्रमाच्या बाबतीत आस्था दाखविली नव्हती. त्यावरून तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांनी कोश्यारी यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यात प्रामुख्याने पक्षाची विभागीय बैठक, पक्षाच्या व्यासपीठावरून होणारी एक जाहीर सभा तसेच दोन वेगवेगळ्या कार्यालयांचे उद्घाटन आणि खा. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट इत्यादी बाबींचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले होते. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी नांदेड-वाघाळा मनपाच्या माध्यमातून करण्यात आली. मनपात सध्या प्रशासकीय राजवट आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पुतळ्याच्या अनावरणाचा आग्रह धरला असला, तरी गृहमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमात त्याबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे मनपा प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून आले.

भाजपाचे कार्यालय अर्धवट

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या तसेच खासदार अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन निश्चित झाल्याचे स्थानिक पातळीवर सांगण्यात आले. त्याचवेळी नांदेडमधील भाजपाच्या नांदेड जिल्हा कार्यालयाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले असल्याचे दिसून आले. काही वर्षांपूर्वी या कार्यालयाचे काम सुरू करण्यात आले. मधल्या काळात प्रवीण साले यांच्यावर बांधकाम करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांची मुदत संपल्यानंतर कार्यालय बांधकामाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची यावरून वाद निर्माण झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!