Homeमनोरंजनकिशोरवयीन पट्टी कॅसिनो गेम खेळत असताना नवी मुंबई मॅनसह ऑनलाइन गेमिंग फसवणूक

किशोरवयीन पट्टी कॅसिनो गेम खेळत असताना नवी मुंबई मॅनसह ऑनलाइन गेमिंग फसवणूक


नवी मुंबई ऑनलाइन गेमिंग फसवणूक: ‘ऑनलाइन गेमिंगमध्ये आर्थिक जोखीम होण्याची शक्यता असते. कृपया जबाबदारीने खेळा’, हे वाक्य तुम्ही अनेकदा जाहिरातींमध्ये ऐकलं असेल. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकजण कायमचे उद्धवस्त होतात. त्यामुळेच जाहिरातीच्या शेवटी हा इशारा देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अशाप्रकारे ऑनलाइन गेमच्या नादी लागून आर्थिक डबघाईला आल्याची अनेक प्रकरण यापूर्वी समोर आली आहे. असाच एक प्रकार आता नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडला आहे.

कोपरखैरणेमध्ये घडला विचित्र प्रकार

नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील रहिवासी सुनीलकुमार सिंह या व्यावसायिकासोबत हा सारा प्रकार घडला आहे. सुनीलकुमार सिंहला ऑनलाईन गेमिंग साईटवर तीन पत्ती आणि कसीनोसारखे गेम खेळणे चांगलेच महागात पडलं आहे. सुनीलकुमार सिंहला ‘सॅट स्पोर्ट डॉट कॉम’ या ऑनलाईन गेमिंग साईटवर तीन पत्ती आणि कसीनो खेळायचे व्यसन लागले होते. यामध्ये सिंह कधी मोठी रक्कम जिंकायचा तर कधी हरायचा. यावेळी अधिक नफा मिळवण्याच्या नादात सिंहने तब्बल 3 कोटी 24 लाख 84 हजार इतकी रक्कम डिपॉजिट म्हणून भरली होती.

पावणे तीन कोटी अडकले

मात्र गेम खेळता खेळता सुनीलकुमार सिंहने पावणे तीन कोटी रुपये कधी गमावले त्याला समजलंही नाही. केवळ 50 लाख इतकी रक्कम सुनीलकुमारला काढता आली. सुनीलकुमार सिंहने 2 कोटी 74 लाख रुपये काढण्याचा विचार केला. मात्र ही रक्कम निघत नव्हती तसेच त्याचे गेमिंग अकाउंट देखील दिसत नव्हते. यावेळी सायबर चोरट्यांकडून 2 कोटी 74 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

पोलिसांनी दाखल करुन घेतला गुन्हा

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सुनीलकुमार सिंहने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ‘सॅट स्पोर्ट डॉट कॉम’ या ऑनलाईन गेमिंग वेबसाईटविरोधात आणि सुनीलकुमार सिंहला फोन करुन रक्कम भरण्यास सांगणाऱ्या व्हॉट्सअप क्रमांकाविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गेमिंग साईट आणि संपर्क करणारे व्हाट्सअप क्रमांक हे परदेशातील असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले असून पोलिसांनी कुठल्याही गेमिंग साईटच्या आहारी न जाण्याचे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी नागरिकांना केले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

0
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद...

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!