Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal Minister Post Politics| Devendra Fadnavis Call Amit Shah | छगन...

Chhagan Bhujbal Minister Post Politics| Devendra Fadnavis Call Amit Shah | छगन भुजबळांना मंत्रिपद कसे मिळाले?: फडणवीस यांच्या माध्यमातून अमित शहांना फोन; NCP ने धनंजय मुंडेंची पोकळी भरून काढली – Mumbai News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांचे मंत्रिपद कापले होते. यामुळे भुजबळ प्रचं

?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी झाला. त्यावेळी छगन भुजबळ यांना सहजपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा दावा केला जात होता. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ हे राज्यातील बडे ओबीसी नेते आहेत. ओबीसी समुदायात त्यांचा एक्का चालतो. पण राष्ट्रवादीने त्यांनाच मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणाही साधला. एवढेच नाही तर त्यांनी शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत वेगळी वाट निवडण्याचे संकेतही दिले.

ओबीसी मंत्र्याची पोकळी भरून काढली

छगन भुजबळांनी आपल्यावर लोकसभा निवडणुकीवेळीही अन्याय झाल्याचा आरोप करून अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत सापडले. या प्रकरणात त्यांचे मंत्रिपदही गेले. यामु्ळे ओबीसी समुदायाचा एक मोठा नेते मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तेव्हाच मुंडे यांच्या जागी भुजबळांना संधी दिली जाईल असा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. त्यानुसार, छगन भुजबळांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांना धनंजय मुंडे यांचेच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळांना कसे मिळाले मंत्रिपद?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी 8 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या भेटीनंतर छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोलणे झाले. त्यानंतर भुजबळांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले. ओबीसी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यामुळे ओबीसी समुदायात नाराजी पसरली होती. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर फटका बसण्याची भीती होती. त्यामुळे ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

मंत्रालयात 204 क्रमांकाचा कक्ष मिळणार?

छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडताच मंत्रालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रालयातील धनंजय मुंडे यांचा 204 क्रमांकाचे दालन जवळपास 2 महिन्यांनंतर उघडण्यात आले आहे. तिथे युद्ध पातळीवर साफसफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे भुजबळांना हेच दालन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भुजबळांना मुंडेंचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयही मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांनी मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी नेटाने पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत.

हे ही वाचा…

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन:पुण्यातील राहत्या घरी 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; आकाशाशी नाते जडलेला तारा निखळला

पुणे – भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांनी झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे एक थोर वैज्ञानिक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळल्याची भावना व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

थायलंडमध्ये मुलाने 10 बौद्ध भिक्षूंना चिरडले, व्हिडिओ:परवानगीशिवाय पिकअप ट्रक चालवत होता; पोलिसांनी अजून गुन्हा...

0
थायलंडमधील मुकदाहन शहरात गुरुवारी एका मुलाने पिकअप ट्रकने बौद्ध भिक्षूंच्या मिरवणुकीला चिरडले. ज्यात किमान 10 भिक्षूंचा मृत्यू झाला आणि 5 गंभीर जखमी झाले...

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ | सोने रु. 1.46 लाख, चांदी रु. 2.33 लाख

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,...
spot_img

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ | सोने रु. 1.46 लाख, चांदी रु. 2.33 लाख

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...
error: Content is protected !!