Homeमहाराष्ट्रतुळजभवन मंदिर दर्शन खर्चाच्या पैशाने व्हीआयपी कोण असेल याबद्दल नवीन नियम दिले

तुळजभवन मंदिर दर्शन खर्चाच्या पैशाने व्हीआयपी कोण असेल याबद्दल नवीन नियम दिले


तुलजापूर मंदिर प्रवेश किंमत: तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दान करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही शुल्काशिवाय अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या श्रेणीच्या वर्गवारीत दर्शन मिळणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आणि मंदिर व्यवस्थापक यांच्या शिफारशीने आलेल्या व्यक्तींना व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी प्रतिव्यक्ती 200 रुपये देणगी शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत कोणाच्या काही सूचना किंवा अभिप्राय असल्यास पुढील आठ दिवसांच्या आत मंदिर समितीकडे दाखल करावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने शिर्डीच्या साई मंदिराच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा भक्तांमध्ये आहे.

मागवले अभिप्राय

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाबाबत प्रस्तावित नियमावलीच्या अनुषंगाने सूचना आणि अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानुसार कोणाला व्हीआयपी म्हणावयाचे याची व्याख्या मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत आहे.

या व्यक्तींना नि:शुल्क दर्शन प्रस्तावित

या नियमावलीनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री, संसद आणि विधिमंडळाचे आजी-माजी सदस्य, राज्यमंत्री दर्जा असलेल्या व्यक्ती, सर्व महामंडळांचे अध्यक्ष, तसेच उपाध्यक्ष, संविधानिक आयोगाचे अध्यक्ष, भारतीय सैन्य दलातील अधिकारी व सैनिक आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन प्रस्तावित आहे. तसेच दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम अथवा वस्तू अर्पण करणाऱ्या भाविकांना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन असणार आहे.

यांनाही मिळणार नि:शुल्क दर्शन

मंदिरातील प्रथा-परंपरेनुसार मंदिरात येणाऱ्या आध्यात्मिक, धार्मिक, मानकरी व मंदिर कामकाजाशी संबंधित व्यक्तींनाही व्हीआयपी दर्शन असेल. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती, महाराष्ट्र व इतर राज्यांतील मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त यांनाही व्हीआयपी समजण्यात येणार आहे. दिव्यांग, स्तनदा माता व मदतनीसाशिवाय चालू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्तींनाही नि:शुल्क दर्शन देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग एकचे सर्व प्रशासकीय अधिकारी कुटुंबासह आल्यास चार व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी 200 रुपये प्रतिव्यक्ती देणगी शुल्क असेल, असे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच शिर्डीच्या साई मंदिरामध्ये देणगीप्रमाणे भक्तांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर तसाच प्रयोग तुळजापूरमध्ये राबवण्याचा विचार सुरु असल्याचं दिसत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!