Homeपुणे / पिंपरी-चिंचवडउलटा चष्मा: काकडीचा ‘बाइट’

उलटा चष्मा: काकडीचा ‘बाइट’


सलग तीन दिवसांचा नागालँड व महाराष्ट्राचा दौरा आटोपून दिल्लीत परतलेले कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान बंगल्याच्या हिरवळीवर निवांत बसले होते. तेवढ्यात त्यांच्या प्रसिद्धीचे काम सांभाळणारे दोन सहाय्यक लगबगीने आले व वर्तमानपत्रांची कात्रणे, वाहिन्या तसेच समाजमाध्यमांवरून प्रसारित झालेल्या चित्रफिती दाखवू लागले. एका चित्रफितीवर ते थबकलेच. ‘बापरे, तब्बल दहा लाख व्ह्यू’ असे म्हणत त्यांनी ती पुन्हा पुन्हा बघायला सुरुवात केली. ‘रास्ते पर बिकनेवाली खिरी खरीद कर खाना तो हर मध्य प्रदेशवासी के जीवन का अभिन्न अंग है’ असे ते पुटपुटले. कसलेच नावीन्य नसलेली ही बाब भक्तांना कशी काय नावीन्यपूर्ण वाटली याचे कोडे त्यांना उमगेना! सहाय्यकांना सांगावे की नाही यावर त्यांनी विचार केला. प्रसिद्धी मिळतेय, तर कशाला गुपित फोडायचे असे मनाशी म्हणत ते शांत बसले.

आम्ही नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे लोक. नदीच्या पात्रातली काकडी खाणे हा आमचा धर्म. मंत्री असणे वा नसण्याशी याचा काहीच संबंध नाही. तरीही देशभरातील भक्तांना मी ताफा थांबवून काकडी विकत घेतली हे जाम आवडलेले दिसते. अनेकांनी याचा संबंध माझ्या मंत्रीपदाशी जोडत सात दशकांत असा कृषीमंत्री बघितला नाही, असेही म्हटले. सध्या ‘ट्रेंडिंग’वर हीच चित्रफीत आहे. याचा अर्थ आणखी चार, पाच दिवस तरी आपलीच चर्चा देशभरात होणार असा विचार मनात येताच मामा कमालीचे सुखावले. म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ मागे पडले की काय अशी शंका मनी येताच त्यांनी जीभ चावली.

मंत्री म्हणून दौरे करताना ताफा थांबवून भाज्या, फळे विकत घ्यायची. विक्रेते शेतकऱ्यांशी संवाद साधायचा ही जाणीवपूर्वक आखलेली योजना आता देशभर लोकप्रिय होतेय हे बघून त्यांचे मन समाधानाने भरून आले. आपल्याला आवडणारी काकडी, भाजीपाला याच काळात रस्त्यावर मिळतो. एकदा पावसाळा सुरू झाला की शेतकरी मशागतीत व्यग्र होतात. रस्त्यावर फारसे कुणी दिसत नाही. त्यामुळे आताच उन्हाच्या झळा सहन करत जास्तीत जास्त दौरे करायचे. वाटेत थांबायचे. प्रसिद्धी कशी मिळेल ते सहाय्यक बघतीलच. बाकी या कृतीला सर्वदूर पसरवायला भक्त आहेतच. पावसाळा सुरू झाला की चिखलाचे साम्राज्य असते. चिखल तसाही आपल्याला आवडत नाहीच. मागे मुख्यमंत्री असताना तो तुडवावा लागू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी उचलून घेतले होते. तेव्हा केवढी किरकिरी झालेली. कसेबसे त्या वादावर पांघरूण घातले. आता नव्याने काही नको. त्यातल्या त्यात देशाच्या शेतीची जबाबदारी आता आपल्यावर. त्यामुळे पावसाआधी जेवढे भटकायचे तेवढे भटकून घ्यायचे. घरी न जेवता रस्त्यातल्या काकडीवरच दिवस काढायचा. लहानपणी करत होतो अगदी तसेच, असे मनाशी ठरवत ते आता कोणत्या राज्यात जायचे यावर विचार करू लागले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला.

राष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी काकडीवर ‘बाइट’ घेण्यासाठी येत आहेत म्हणून. त्यांच्याशी बोलताना मध्य प्रदेश व काकडीचे नाते अजिबात सांगायचे नाही, असे स्वत:ला बजावत ते सावरून बसले. नेमके तेव्हाच त्यांच्या ताफ्यातील चालक वाहनांच्या डिक्कीतून खराब झालेल्या काकड्या, भाजीपाला व फळांच्या पिशव्या फेकण्यासाठी म्हणून बाहेर काढत होते. हे बघून चिडलेल्या मामाजींनी त्यांना तात्काळ रोखले व मग त्यांचा आंबा तर आपली काकडी असे म्हणत ते बाइटसाठी सज्ज झाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!