Homeमनोरंजनड्रेसवर 1 महिन्याची मेहनत अन् रेड कार्पेटवर हॉट अंदाजात दिसली नॅन्सी, प्रियांका...

ड्रेसवर 1 महिन्याची मेहनत अन् रेड कार्पेटवर हॉट अंदाजात दिसली नॅन्सी, प्रियांका चोप्राशी खास कनेक्शन!


कॅन्स फिल्म फेस्टिव्हल नॅन्सी टियागी: फ्रान्समध्ये असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बागपतच्या बरनावातील मुलगी नॅन्सी त्यागीनं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. फॅशन डिझायनर नॅन्सीनं रेड कार्पेटवर स्वत: डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. गेल्या वर्षीचा गुलाबा रंगाचा तिचा ड्रेस खूप चर्चेत आहे. नॅन्सी म्हणाली की इथे माझं आयुष्य बदललं. यावेळी उत्साह वाढला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॅन्सी ही दुसऱ्यांदा पोहोचली होती. यावेळी तिनं आणखी हटके स्टाईलचे कपडे शिवले आहेत आणि तिनं स्वत: स्टाईल देखील केले आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नॅन्सीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये तिनं परिधान केलेल्या या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी देखील तिनं गुलाबी रंगाची शेड असलेला आणि फ्रिल डिझाइन असलेला ड्रेस परिधान केला. तर दुसऱ्या दिवशीचा तिचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. नॅन्सीनं खूप हॉट आणि ब्यूटीफुल क्रिस्टल-पर्ल ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस परिधान करून ती दुसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर तिनं एन्ट्री केली.

नॅन्सीनं दुसऱ्या दिवशी जो ड्रेस परिधान केला तो बनवायला तिला 1 महिन्याचा काळ लागला. डा ड्रेस बनवण्यासाठी नॅन्सीनं कसं जुगाड केलं त्याविषयी तिनं सांगितलं आहे. नॅन्सीनं क्रिस्टलनं बनवलेला हा मिनी ड्रेस परिधान केला. तर रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी दिसली. या ड्रेससोबत तिनं लॉन्ग ट्रेल बनवली होती. पण लॉन्ग ट्रेलवर बॅन आणल्यानंतर त्याला ट्विस्ट करत तिनं ओव्हरकोड म्हणून त्याला कॅरी केलं. तर यासोबत नॅन्सीनं सिल्वर एम्बेलिशमेंट असलेली स्टायलिश बॅग कॅरी केली होती. त्यासोबत शाइनी हील्स तिनं घातल्या होत्या. तिच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले.

हेही वाचा : ‘देवदूत आहेत नाना पाटेकर’; विधवा महिलांना करतात मदत, मराठवाडा-लातूरकरांनी दिलंय देवाचं स्थान!

हे फोटो शेअर करत नॅन्सीनं कॅप्शन दिलं की ‘हा रंग माझ्या आईचा आवडता आहे. या ड्रेसला बनवण्यासाठी एक महिना लागला आणि मी अखेरपर्यंत तयारीत राहिलो. कारण ड्रेस खूपच हेवी होता. त्यामुळे मनापासून आभार. त्या सगळ्यांचे आभार जे या प्रवासाचा भाग राहिले. तुमच्या सगळ्यांशिवाय हा क्षण पुन्हा एकदा इतका स्पेशल होणं शक्य नव्हतं.’ दरम्यान, नॅन्सी ही प्रियांका चोप्राची पर्सनल स्टायलिस्ट असल्याचं म्हटलं जातं. तर तिनं अनन्या पांडेसाठी देखील ड्रेस डिझाइन केला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!