नागपूरच्या खापरखेडा गावात रविवारी (दि. 18) भाजपने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान’ अशा शब्दांत इशारा दिला. या रॅलीत त्यांनी ‘ऑपरेशन सिं
?
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली असली तरी भारतीय सैन्याविषयीचा विश्वास दाखवला पाहिजे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे सैन्यावरील विश्वास कमी होतो. या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः सहभागी झाले होते आणि त्यांनी एक किलोमीटर अंतर चालत यात्रा पूर्ण केली. यात्रेच्या समारोपानंतर आयोजित सभेत त्यांनी भारतीय सैन्याच्या सामर्थ्याबद्दल बोलताना, ‘ऑपरेशन सिंधूर’च्या यशाबद्दल गौरव केला. त्यांनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय सेनेवर अविश्वास दाखवणाऱ्यांना ‘जय हिंद’ म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने ‘जय हिंद यात्रा’ काढली, ही स्वागतार्ह बाब असली तरी ती केवळ राजकीय यात्रा होऊ नये, ही आमची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलत आहेत, ते पाहता त्यांच्या वक्तव्यात भारतीय सेनेबद्दलचा अविश्वास दिसतो. एकीकडे सेनेवर शंका घेता, दुसरीकडे ‘जय हिंद’ म्हणता – हे दोघे एकत्र चालणार नाही. ‘जय हिंद’ तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने सेनेच्या पाठीशी उभे राहाल, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
तुर्कीसंबंधात घेतलेला निर्णय देशभक्तीचाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुर्कीसारखा देश दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देतो, हे मानवतेविरोधातील अपराध असल्याची टीका करत, भारतीयांनी अशा देशांशी व्यवहार न करण्याचा घेतलेला निर्णय हा देशभक्तीचाच एक भाग आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी भारतीय जनतेचे यासाठी अभिनंदनही केले.































