Homeदेश-विदेशनागपूरची महिला काश्मीरमधून बेपत्ता, मुलाला एकटं सोडून LOC पार केली? पाकमधील धर्मगुरू...

नागपूरची महिला काश्मीरमधून बेपत्ता, मुलाला एकटं सोडून LOC पार केली? पाकमधील धर्मगुरू…


नागपूर महिला हरवल्या: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने भारताची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. रियाणा पोलिसांव्यतिरिक्त, मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय) आणि इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चे पथक हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची देखील चौकशी करण्यात येत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपुरातील महिलाही पाकिस्तानात गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 43 वर्षीय महिला काश्मीरमधून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. मुलाला इथेच सोडून ही महिला पाकमध्ये पळाल्याची शक्यता असून पाक धर्मगुरुच्या ऑनलाईन ओळखीतून महिलेने LOC पार केले असून शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नागपूरच्या सुनीता जामगडे या महिलेच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारगिलच्या सीमेवरील शेवटच्या ‘हुंदरमान’ गावातून तिने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुनीता जामगडे ही नागपूरमधील संत कबीर नगर भागात राहणारी महिला असून, ती पूर्वी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती.

ती 14 मे रोजी आपल्या 12 वर्षीय मुलासह काश्मीरच्या दिशेने निघाली होती. मुलाला थोड्याच वेळात परत येते असे सांगून सोडून दिले आणि त्यानंतर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. स्थानिक नागरिकांनी हा मुलगा एकटाच फिरताना पाहून त्याला तातडीने लडाख पोलिसांच्या हवाली केले. सुनिता ही काही काळापासून पाकिस्तानमधील एका धर्मगुरूच्या संपर्कात होती. त्याच्यासोबतच्या ऑनलाइन संभाषणांमुळे ती मानसिकदृष्ट्या प्रभावित झाली होती, असा संशय आहे. मात्र महिला मानसिक रुग्ण असल्याचा दावा तिच्या आईने केला आहे.

ज्योतीच्या हेरगिरी कनेक्शनची तपासणी

युट्यूबर  ज्योती मल्होत्रा यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही कारवाई केली असून, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. ज्योती मल्होत्रा यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी गोपनीयतेच्या कारणास्तव अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!