Homeदेश-विदेशपाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो पोहत होता

पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो पोहत होता


ऑपरेशन सिंदूर वर शेहबाझ शरीफ: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होते. स्वत: त्यांनीच हा खुलासा केला आहे. इतकंच नाही तर आपल्या लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर पाहून भारताने शस्त्रसंधीसाठी विनंती केल्याचा हास्यास्पद दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, पाकिस्तानातील काही पत्रकारही त्यांची खिल्ली उडवत तथ्य वेगळं असल्याचं सांगत आहेत. इस्लामाबादमधील पाकिस्तान स्मारकात आयोजित एका विशेष ‘यौम-ए-तशकूर’ (Youm-e-Tashakur) कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.

काय म्हणाले शहबाज शरीफ?

“सकाळची वेळ होती. मला सवय असल्याने, फजरनंतर मी स्विमिंग करतो. मी माझा सेक्यूअर फोन सोबत नेला होता. मी स्टाफला जर घंटी वाजली तर लगेच सांगा असं सांगितलं होतं. घंटी वाजल्यानंतर जनरल मुनीर लाईनवर होते. आम्ही भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, आता शस्त्रसंधीसाठी विनंती केली जात आहे, तुमचा काय विचार आहे? अशी विचारणा त्यांनी केली. मी म्हटलं यापेक्षा मोठी काय गोष्ट असू शकते. तुम्ही शत्रूला कानाखाली मारली असून, त्याचं डोकं गरगरलं आहे, त्यामुळे आता ते शस्त्रंसधघीसाठी मजबूर आहेत. तुम्ही शस्त्रसंधीची विनंती स्विकारा,” असं शहबाज शरीफ म्हणाले.

भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याची कबुली

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुलीही दिली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री 2.30 वाजता फोन करुन आपल्याला ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या हल्ल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शहबाज शरीफ यांनी सांगितलं की, “9-10 मे च्या मध्यरात्री 2.30 च्या सुमारास, लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी मला सुरक्षित लाईनवरून फोन करून माहिती दिली की हिंदुस्तानी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केला आहे. मी तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगू शकतो की जनरल यांच्या आवाजात आत्मविश्वास आणि देशभक्ती होती”.

“आपल्या हवाई दलाने देशाला वाचवण्यासाठी आपल्याच देशात विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला. यासह त्यांनी चिनी विमानांमध्ये आधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला,” असंही ते म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम | जून 17 अद्यतने25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या...

17 जूनचे राशीभविष्य:सिंह, मीन राशीच्या लोकांना पदोन्नतीची संधी; कर्क, मकर राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
बुधवार, 17 जून रोजी कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेली देयके मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि...

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...
spot_img

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...
error: Content is protected !!