राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण दिल्याचा इतिहास सांगत शरद पवार मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयाचा किस्सा सांगितला. महिलांना घर सांभाळता येत
?
शरद पवार मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचे विधेयक सभागृहात मांडण्यात आले. शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की, हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबायचे नाही. त्यामुळे आम्ही रात्री चार वाजेपर्यंत सभागृह चालवले आणि शेवटी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मंजूर केले, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.
महिलांच्या प्रगतीवर समाधान व्यक्त
अजित पवार म्हणाले की, आज मुली शिक्षणात, स्पर्धा परीक्षांत, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संरक्षण क्षेत्रात पुढे जात आहेत. त्या एकाग्र असतात, त्यांचे लक्ष विचलित होत नाही. ज्या देशात महिलांना सन्मान मिळतो, तो देश प्रगत होतो. आणि जिथे महिलांना दडपले जाते, ते देश मागे राहतात.
फुलेंच्या कार्याचा गौरव
अजित पवार म्हणाले की, पूर्वी मुलींना शिकण्याचा अधिकारही नव्हता. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. आज सरकारने तोच भिडे वाडा ताब्यात घेतला असून तिथे पुन्हा कार्य सुरू केले आहे, अशी माहिती देत त्यांनी इतिहासातल्या क्रांतीचा गौरव केला.
महिला अधिकाऱ्यांवर टीकाकारांना सुनावले
पहेलगाममध्ये अतिरेक्यांनी घातलेल्या हल्ल्यानंतर, विंग कमांडर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह या दोन महिला अधिकाऱ्यांनी मीडियासमोर येऊन माहिती दिली. काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली, ती खूपच चुकीची आहे. आम्हाला त्यांचे वाईट वाटते, असे म्हणत अजित पवारांनी टीकाकारांवर निशाणा साधला. देशावर हल्ला झाला की आपण सर्वजण एकत्र उभे राहतो. त्या काळातही महिलांनी धाडस दाखवून माहिती दिली. त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
































