Homeमहाराष्ट्रमुंबईत पावसाच्या सरी, राज्यातही वादळी पावसाचा इशारा

मुंबईत पावसाच्या सरी, राज्यातही वादळी पावसाचा इशारा


मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागात शनिवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. विशेषत: उपनगर परिसरात पावसाची नोंद झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत सरी कोसळल्या. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. वांद्रे, पवई, दादर, वरळी या भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. आज मुंबईत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर राहील. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण असेल. दरम्यान, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वळिवाचा पाऊस सुरुच आहे. आजही अनेक भागात सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.

हेही वाचा

‘एक देश एक निवडणूक’ची समिती आजपासून महाराष्ट्रात

नै w त्य मोस्मीसारखे होते ‘

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही वाटचाल केली. शुक्रवारी मोसमी वाऱ्यांची वाटचाल ‘जैसे थे’ होती. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.

वळिवाचा आणि मोसमी पाऊस

पूर्वमोसमी म्हणजेच वळिवाच्या पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते. हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.

वळिवाच्या पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे-पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.

वळिवाचा पाऊस गडगडाटासह असतो. मोसमी पाऊस संततधार, बऱ्याचदा संथ आणि शांतपणे येतो.

पूर्व मोसमी पावसाचा जोर अधिक राहणार

पुढील पंधरा दिवस म्हणजेच ३१ मेपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होईपर्यंत कोकण किनारपट्टी तसेच संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई समोर अरबी समुद्रात केंद्र असलेले एक व तेलंगणा राज्यावर केंद्र असलेले असे दुसरे अशा दोन आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची ही शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यात वळिवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जपानच्या PM ताकाइची राष्ट्रपती भवनात पोहोचल्या:गार्ड ऑफ ऑनरने स्वागत; आज मोदींसोबत गुंतवणूक आणि सुरक्षा...

0
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांचे गुरुवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. पंतप्रधान...

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!