Homeमहाराष्ट्रShocking Big News 100 teachers in Dharashiv fake disability certificates to avoid...

Shocking Big News 100 teachers in Dharashiv fake disability certificates to avoid transfer; धाराशिवमध्ये तब्बल 100 शिक्षक अपंग; सत्य समोर आल्यावर सगळेच हारदरले


ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव : नोकरीमध्ये बदली हा कामकाजाचा अविभाज्य भाग असतो. मात्र या बदलीचा काही जण विनाकारण बाऊ करतात. आणि मग बदली टाळण्यासाठी, तसंच आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वाट्टेल ते मार्ग शोधले जातात. कहर म्हणजे पिढी घडवणारे शिक्षकही याला अपवाद नाहीत. शिक्षकांनीच बदली टाळण्यासाठी अक्षरशः गैरप्रकाराचे धडे गिरवल्याचं समोर आलंय. अशाच काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन, सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतल्याच धक्कादायक वास्तव पाहायला मिळालाय. शिक्षकांच्या या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकणारा ‘झी २४ तास’चा हा पंचनामा.

समाजाला आणि भावी पिढीला दिशा दाखवण्याचं काम शिक्षक करत असतो. त्यामुळंच नैतिकदृष्ट्या शिक्षकी पेक्षा सर्वोच्च समजला जातो. पण यात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारा एक बदली घोटाळा धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आलाय. आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करुन आवडत्या ठिकाणी बदली मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. त्यामुळं दुर्गम ठिकाणच्या शाळेवर जाण्यासाठी कायम नाखूष असलेल्या शिक्षकांची अडचण आली. काही शिक्षकांनी यावर नामी तोडगा शोधलाय. या शिक्षकांनी कँन्सर आणि ह्रदयरोगासारख्या आजाराची बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवली. काहींनी  तर स्वतःला हातापायानं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं. एकट्या धाराशिव जिल्ह्यात धडधाकट असलेल्या 100 जणांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिक्षकांनी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावात किंवा गावाजवळ बदली मिळवण्यासाठी केलेली धडपड शिक्षण विभागाच्याही लक्षात आली. त्यामुळं त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत काही धक्कादायक तथ्यं समोर आलीयेत.  त्यानुसार 39 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. तर 21 शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आपली बदली करवून घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यावर बोगसगिरी करणा-या मास्तरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही उपशिक्षणाधिका-यांनी दिलेत.

समाजाला नैतिकतेचे धडे देणारे शिक्षक आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी दिव्यांग झाल्याचं सोंग करतायेत. नैतिकदृष्ट्या अधोगतीकडे गेलेले शिक्षक समाजाला कसे वाट दाखवणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जपानच्या PM ताकाइची राष्ट्रपती भवनात पोहोचल्या:गार्ड ऑफ ऑनरने स्वागत; आज मोदींसोबत गुंतवणूक आणि सुरक्षा...

0
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांचे गुरुवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. पंतप्रधान...

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!