Homeमहाराष्ट्र‘पीएमपी’च्या दोन मार्गिकांचा विस्तार

‘पीएमपी’च्या दोन मार्गिकांचा विस्तार


पुणे: निगडी आणि रावेत येथील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत सुलभ प्रवास करता यावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दोन बस मार्गिकांचा विस्तार केला आहे.

सदुंबरे सिद्धांत महाविद्यालय ते निगडी आणि समीर लॉन्स रावेत ते निगडी या दोन मार्गिकांवरील बस आता पिंपरी रस्त्यावरील आंबेडकर चौकापर्यंत धावणार आहे. यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रवाशांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

सदुंबरे सिद्धांत कॉलेज ते निगडीपर्यंतच्या मार्गावर दोन बस आणि समीर लॉन्स रावेत ते निगडी या मार्गावर सहा अशा आठ बस आंबेडकर चौकापर्यंत धावणार आहेत. पिंपरी येथे मेट्रोचे स्थानक असून भक्ती-शक्तीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा विस्तार होणार आहे. पीएमपीने दोन्ही मार्गांचा पिंपरीपर्यंत विस्तार केल्याने मेट्रो स्थानकांवर सहज पोहोचता येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

पूरपरिस्थितीमध्ये जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सज्ज राहावे, पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची सूचना

सदुंबरे आणि रावेत परिसरातील नागरिकांना पिंपरीमध्ये जाण्यासाठी ‘पीएमपी’ची थेट सेवा नसल्याने नोकरदार, आयटी कंपनीतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. दोन मार्गांचा पिंपरी मेट्रो स्थानकापर्यंत विस्तार केल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. – नितीन नार्वेकर,सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!