Jammu Kashmir Encounter: जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामधील त्राल येथे गुरुवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा जवानांनी या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. त्रालमध्ये अद्यापही गोळीबार सुरु आहे. लपलेल्या दहतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवादी आमिर वानीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो व्हिडीओ कॉलवरुन आपल्या आईशी बोलताना दिसत आहे.
व्हिडीओत आमिर वानीची आई त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी विनवणी करता दिसत आहे. पण तो आपल्या आईचं म्हणणं ऐकण्यास नकार देतो. व्हिडीओ कॉलेमध्ये त्याची आई स्थानिक भाषेत बोलताना ऐकू येत आहे की, “मुला आत्मसमर्पण कर”. पण आमिर वानी मुलाचं काहीच ऐकत नाही आणि जवानांवर गोळीबार करतो. अखेरीस सुरक्षा जवानांसह झालेल्या चकमकीत तो मारला जातो.
पाकिस्तानने दहशतवादी प्रायोजित दहशतवादी आमिर नाझीर वानी जयश ई मुहम्मद यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय सैन्य आणि जम्मू -काश्मीर पोलिसांनी सुरक्षा कारवाईत ठार मारण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला बोलावले. pic.twitter.com/39y8j3lhc1
– आदित्य राज कौल (@adityarajkal) 15 मे, 2025
व्हिडीओ कॉलमध्ये जेव्हा आई आमिरला सांगते की, ‘मुला सरेंडर कर’ त्यावर तो उत्तर देतो ‘सैन्याला समोर येऊ दे, मग पाहतो’.
हा चकमकीच्या आधीचा व्हिडीओ आहे. ज्या घऱात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. तिथूनच तो व्हिडीओ कॉलवर बोलत होता असं समजत आहे. व्हिडीओ कॉलवर आईशी बोलत असताना त्याच्या हातात एके-47 रायफल दिसत आहे.
ट्रॅलचे ड्रोन फुटेज, या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने तटस्थ होण्याच्या काही क्षणांपूर्वी.
बारकाईने पहा – त्यांच्या दृष्टीने ही भीती आहे.
जेव्हा आपण भारतीय सशस्त्र सैन्यासमोर समोरासमोर येता तेव्हा असे दिसते.#इंडियानमी
pic.twitter.com/pwolu4joki– निखिल सैनी (@इनीखिलसैनी) 15 मे, 2025
लष्कराकडून आत्मसर्पण करण्याचं आवाहन, पण झाडली गोळी
आमिरशी त्याची आई, बहीण आणि चकमकीत ठार झालेल्या आसिफच्या बहिणीने संवाद साधला. आसिफच्या बहिणीने विचारलं होतं, माझा भाऊ कुठे आहे? आसिफ तोच दहशतवादी आहे ज्याचं घर IED ने उडवण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने आत्मसमर्पण करावं अशी लष्कराची इच्छा होती. मात्र त्याने आत्मसमर्पण करण्याऐवजी सैन्यांवर गोळी चालवली.































