Homeमनोरंजनजर रक्त लाल रंग असेल तर नसा हिरव्या किंवा निळ्या का दिसतात

जर रक्त लाल रंग असेल तर नसा हिरव्या किंवा निळ्या का दिसतात


आपलं रक्त लाल रंगाचं असतं हे सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्ही जर कधी नीट पाहिलं असेल तर आपल्या नसांचा रंग हिरवा किंवा निळा असतो. मग अशावेळी डोक्यात विचार येतो की, रक्ताचा रंग लाल असताना नसा मात्र हिरव्या किंवा निळ्या का दिसतात?  तुम्हालाही हा प्रश्न सतावत असेलतर यामागी रंजक कारण जाणून घ्या.

आपल्या रक्तात हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन असतं, जे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतं. जेव्हा हे हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी मिळतं तेव्हा ते चमकदार लाल होते. हे रक्त आपल्या शरीरात वाहतं.

नसा निळ्या का दिसतात?

हा खरं तर एक भ्रम आहे जो आपल्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या संयुक्त युक्तीचा परिणाम आहे. प्रत्यक्षात, शिरा निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या नसतात. फक्त आपल्या डोळ्यांना त्या तशा दिसतात.

यामागील कारण काय आहे?

– जेव्हा प्रकाश आपल्या त्वचेवर पडतो तेव्हा तो वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो.
– लाल रंगाच्या लहरी जास्त असतात आणि त्या त्वचेत खोलवर जाऊ शकतात.
– निळ्या लहरी कमी खोलीपर्यंत प्रवास करतात आणि लवकर परावर्तित होतात.
यामुळे, आपले डोळे बहुतेक निळ्या लही टिपतात आणि आपल्याला शिरा निळ्या किंवा हिरव्या दिसतात.

व्हिज्युअल ट्रीक

ही खरं तर व्हिज्युअल ट्रीक आहे. आपले डोळे आणि मेंदू एकत्रितपणे आपल्याला जे रंग दाखवतात ते गरजेचं नाही की तसेच असावेत. नसांच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारा प्रकाश आणि त्वचेखालील पोत एकत्रितपणे एक भ्रम निर्माण करतात ज्यामुळे त्या निळ्या दिसतात.

ऑक्सिजनच्या प्रमाणाचा काहीही संबंध नाही

अनेकांना वाटतं की निळा रंग नसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असलेले रक्त असल्यामुळे असतो. पण हे खरं नाही. ऑक्सिजनमुक्त रक्त देखील गडद लाल असते, ​​पण निळे नाही. म्हणून निळा दिसणे हे केवळ प्रकाश आणि त्वचेच्या पोताचा परिणाम आहे, रक्ताच्या रंगाचा नाही.

त्वचेचा रंग आणि नसांमधील फरक

गोरी त्वचा असलेल्या लोकांमध्ये शिरा बहुतेकदा अधिक स्पष्ट आणि निळ्या/हिरव्या दिसतात, तर गडद त्वचेमध्ये हा फरक कमी लक्षात येतो. त्वचेची जाडी, रंग आणि नसांची खोली या सर्व गोष्टी तुम्हाला शिरा कोणत्या रंगाच्या दिसतील हे ठरवतात.

प्रत्येकाला शिरा सारख्याच प्रकारे दिसत नाहीत

मनोरंजक गोष्ट म्हणजे, प्रत्येक माणसाचे डोळे रंगाबाबत सारखेच संवेदनशील नसतात. त्याच शिरा काहींना किंचित हिरव्या, काहींना निळ्या आणि काहींना राखाडी दिसू शकतात. ते पूर्णपणे तुमच्या व्हिज्युअल परसेप्शनवर अवलंबून आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर नसांचा खरा रंग निळा किंवा हिरवा नसतो, परंतु तो तसा दिसतो कारण आपले डोळे आणि मेंदू एकत्रितपणे प्रकाश किरणांना वेगवेगळ्या प्रकारे पाहतात आणि त्यांचा अर्थ लावतात. हे विज्ञान आणि दृष्टिभ्रमाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि हे सिद्ध करते की तुम्ही जे पाहता ते नेहमीच वास्तव नसते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!