Homeदेश-विदेशडॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या नावाने केंद्र सरकारची इंटरकास्ट विवाह योजना बंद केली

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या नावाने केंद्र सरकारची इंटरकास्ट विवाह योजना बंद केली


केंद्र सरकार योजना: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी, या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे.

कधी सुरु झालेली ही योजना?

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने 2014-15 पासून ही योजना सुरू होती. परंतु, कुठलेही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचे थेट पत्रच दिले जात आहे.

ही योजना नेमकी काय होती?

केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जात होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणे आवश्यक होते. विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे व राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनाही पाठवलं पत्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचे दर्शवले जाते. परंतु, पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही योजना बंद झाल्याचे कळवण्यात आले आहे. तसेच सामाजिक न्याय आयुक्तालयानेही सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झाल्याचे पत्र पाठवले आहे.

‘आंतरजातीय’ विवाहाचे प्रमाण अत्यअल्प

जात, धर्माच्या भिंती भेदून विवाह करण्याचे प्रमाण आजही कमी आहे. अनेक संस्थांच्या अहवालानुसार, भारतात हे प्रमाण केवळ 5 टक्के इतके आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!