Homeदेश-विदेशपाकिस्तानातले मराठे! 300 वर्षांपासून वास्तव्य अन्...; पण महाराष्ट्रातून बलुचिस्तानात कसे पोहोचले?

पाकिस्तानातले मराठे! 300 वर्षांपासून वास्तव्य अन्…; पण महाराष्ट्रातून बलुचिस्तानात कसे पोहोचले?


बलोच मराठा: पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्विकारावा लागला होता. पानिपतच्या युद्धाला 250 पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही युद्धाच्या खुणा ताज्या आहेत. पानिपतच्या युद्धात पराभव पत्करावा लागल्याने मराठा सम्राज्याच्या उतरती कळा लागली. लाखो सैनिक मारले गेले, तर कित्येक जण बेपत्ता झाले. युद्धानंतर काही मराठे पानिपतमध्येच स्थायिक झाले. तर, सुमारे 25 हजार मराठी सैनिकांना बंदी बनवून अफगाणिस्तानला नेण्याचा विचार अब्दालीने केला होता. मात्र पानिपतच्या युद्धात अनेक बलुची शासकाचे सैनिक अब्दालीच्या बाजूने लढले होते.त्यामुळं अब्दालीने मोबदला म्हणून सारे मराठा युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट स्वरुपात दिले होते. जे शेवटपर्यंत तिथेच पाहिले. मात्र आजही हे बलुच मराठे म्हणून ओळखले जातात. 300 वर्षांनंतरही त्यांना आपल्या मायभूमीची आस लागली आहे.

अब्दालीने युद्धकैद्यांना बलुचिस्तानात सोडल्यानंतर बलुचिस्तानचा शासक मीरा नासीर खान नुरीने या सर्व मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली. त्याने सैनिकांना वेगवेगळ्या जातीत विभागाले. त्यात बुगती, मर्री, गुरचानी,मझारी, रायसानी या काबिल्यांचा समावेश होता. या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजात ही कायम आहे. बलुचिस्तानमध्ये आल्यानंतर तेथील मराठ्यांना आता हाच आपला प्रांत म्हणून नव्याने आयुष्याला सुरुवात केली. पण या परक्या मातीतही ते आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ राहिले. आजही बलुच मराठ्यांमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती पाहायला मिळते. त्यांच्या लग्नांमध्ये मराठी प्रथा दिसून येतात.

बलुचिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या मराठ्यांपैकी काहींनी शेती करण्यास सुरुवात केली. तर काहीं सैन्यात सहभागी झाले.बुगटी मराठामध्ये अनेक उपशाखा असून त्यांच्या दरुरग मराठा आणि साऊ (शाहू) मराठा यांचा दर्जा सर्वात मोठा मानला जातो. म्हणजेच इथे ही मराठी संस्कृती दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील शाहु छत्रपती यांच्या नावावरुनच या जमातीला नाव देण्यात आलं. इतकंच नव्हे तर, पेशव्यांसोबत साधर्म्य आढळणारे पेशवानी नावही बलुची मराठ्यांमध्ये आढळते. बलुचींची भाषा मराठीशी जवळ जाणारी आहे. शाहू मराठा जमातीमध्ये मराठमोळा असा आई हाच शब्द वापरला जातो.

बलोची बुगटी मराठ्यांना इस्लाम धर्म पत्करला असला तरी त्यांच्या लग्नात मराठी संस्कृती पाहायला मिळते. लग्नापूर्वी हळद लागणे, घाणा भरणे, माप ओलांडणे, लग्नात गाठ बांधणे या साऱ्या प्रथा बुगती मराठ्यांच्या लग्नात होतात. महाराष्ट्रापासून हजारो कोसावर दूर असणारे हे मराठे आजही आपली संस्कृती टिकवून आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!