Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक

मुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक


मुंबई: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पवई, ओशिवरा आणि दादर भागात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण पाच कोटी ८० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत तीन तस्करांना अटक करण्यात आली. विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त अमली पदार्थांमध्ये मेफेड्रोन (एमडी) व हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.

पहिली कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाने पवईच्या साकी विहार रोड परिसरात ५ मे रोजी केली. त्यावेळी संशयावरून एका व्यक्तीला अडवण्यात आले. त्याच्या तपासणीत १०८ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ सापडले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील अदाजे किंमत २१ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला एमडी पुरवणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या कारवाईत घाटकोपर युनिटने ओशिवराच्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात सापळा रचला होता. येथे एका आरोपीकडून दोन किलो ४० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची किंमत सुमारे दोन कोटी चार लाख रुपये आहे.तिसरी कारवाई वरळी कक्षाने दादर कॅटरिंग महाविद्यालयाजवळ केली. येथे एका आरोपीकडून तीन किलो ५५० ग्रॅम उच्च प्रतीचे हायड्रॉपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची किंमत अंदाजे तीन कोटी ५५ लाख कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली.

हेही वाचा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांचा परदेश दौरा रद्द

अटक केलेले आरोपी ओशिवरा व दादर परिसरात हायड्रोपोनिक गांजाची अवैध तस्करी करीत होते. याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथक अधिक तपास करीत आहेत. आझाद मैदान कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, घाटकोपर कक्षाचे अनिल ढोळे आणि वरळी कक्षाचे प्रभारी संतोष साळुंखे यांच्या पथकाने या कारवाया केल्या. याप्रकरणी आरोपींच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली असून त्याद्वारे तपास करीत आहेत. तसेच आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री केली असून त्याबाबतही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. जप्त करण्यात आलेला हायड्रोपोनिक गांजा परदेशातून आणल्याचा संशय आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!