Homeदेश-विदेश...तर चांगलं झालं असतं; भारताच्या हल्ल्यात कुटुंबातील 14 जण गमावलेल्या दहशतवादी मसूदचं...

…तर चांगलं झालं असतं; भारताच्या हल्ल्यात कुटुंबातील 14 जण गमावलेल्या दहशतवादी मसूदचं विधान


मसूद अझर कुटुंबाचा मृत्यू: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैनाने पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर मध्यरात्री साधारण दीडच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या हल्ल्यात दहशतवादी संघटना जैशचा म्होरक्या अजहर मसूदच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाला आहे. त्याच्या कुटुंबातील तब्बल 14 सदस्य या हल्ल्यात ठार झाले आहेत.

दहशतवादी अजहर मसूद पाकिस्तानातून सातत्याने दहशतवादी कारवाया करत असल्याचे समोर आलं होतं. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केले. या कारवाईत सैन्याने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईत मसूदच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला. या हल्ल्यात मसूदची बहीणदेखील ठार झाली आहे.

कंधार विमान हायजैकचा मास्टरमाइंड आणि जैश- ए-मोहम्मदचे प्रमुख मौलाना मसूद अजहरने एक पोस्टदेखील केली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, बहावलपूरमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 सहकारी मारले गेले. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, मसूद अजहरने एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्याने घरातील सदस्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. त्याने म्हटलं आहे की, मृतांमध्ये त्याची मोठी बहिण तिचा पती, त्याचा पुतण्या आणि त्याची पत्नी तसंच, एक पुतणी आणि तिची पाच मुलांचा समावेश आहे. तसंच, त्याचे तीन सहकारीदेखील मारले गेले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=g4d_ua7gbk4

पाकिस्तानच्या माध्यमांनुसार, आज दुपारी 4 वाजता बहावलपूर येथे 14 जणांवर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. सूत्रानुसार यावेळी अजहरदेखील उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर, अजहर मसूदने निवेदनात म्हटलं आहे की, माझादेखील मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!