Homeमनोरंजन'ऑपरेशन सिंदूर'नंतर शाहीद आफ्रिदीवर डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ, भारतीय सैन्याला बिनकामाचे...

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शाहीद आफ्रिदीवर डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ, भारतीय सैन्याला बिनकामाचे म्हटल्याचा घेतला बदला!


शाहिद आफ्रिदी ट्रोल: जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केलीय. भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्र मिळून ऑपरेशन करत पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक करत लक्ष्य केलंय. रिपोर्टनुसार, या हल्ल्यात 90 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. भारतीय सैन्याने याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिलंय.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचा गौरव केला जातोय. दुसरीकडे  गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या बाजून बोलणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या पोस्ट दाखवून ट्रोल केलं जातय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू शाहीद आफ्रिदीदेखील यात आहे.

काय म्हणाला होता आफ्रीदी?

काही दिवसांपूर्वीच, समा टीव्हीवरील कार्यक्रमात काश्मीरमध्ये भारताच्या लष्करी उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शाहीद आफ्रिदी व्हायरल झाला होता.’8 लाखांची फौज असताना हे झालं, याचा अर्थ तुम्ही नालायक आहात. बिनाकामाचे असून तुम्ही नागरिकांना सुरक्षा देऊ शकला नाहीत.’, अशी प्रतिक्रिया शाहीद आफ्रीदीने दिली होती.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने सीमोल्लंघन न करता दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार केलं. यानंतर इंटरनेटवर खळबळ भारतीय यूजर्सनी आफ्रिदीला मीम्स टॅग करत ट्रोल केलंय. ‘आ गया स्वाद?’ असं एकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.दुसऱ्या एका युजरने ‘शाहीद आफ्रीदी कुठे लपलायस? असा प्रश्न विचारला.

भारतीय क्रिकेटपटूंच्या पोस्ट

ऑपरेशन सिंदू सदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच क्रिकेट क्षेत्रातील मंडळीही मागे हटली नाहीत. माजी आणि सध्याचे दोन्ही प्रमुख भारतीय क्रिकेटपटूंनी भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात केल्या.

गंभीरची पोस्ट

भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचे खासदार गौतम गंभीर त्याच्या देशभक्तीपर वक्तव्यासाठी ओळखला जातो. त्याने भारतीय सैनिकांचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिले, ‘जय हिंद! न्याय मिळाला. #ऑपरेशनसिंदूर; गंभीरची पोस्ट काही मिनिटांत खूपच व्हायरल झाली. यूजर्सनी सशस्त्र दलांच्या पाठीशी नेहमीच उभे राहिल्याबद्दल त्याचे कौतुक केले. आकाश चोप्रा, प्रज्ञान ओझा, वरुण चक्रवर्ती यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टमधून सैन्याला सलाम केला. क्रिकेट विश्लेषक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही याच भावना व्यक्त केल्या. ‘जेव्हा शत्रू हल्ला करतो तेव्हा भारत अधिक जोरदार प्रहार करतो. आपल्या सैन्याचा अभिमान आहे.’, असे आकाश चोप्राने म्हटलंय. प्रज्ञान ओझाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, टहा सूड नाही. हा न्याय आहे. हे शक्य करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला सलाम.’ दरम्यान केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘रिस्पेक्ट’ या कॅप्शनसह भारतीय लष्कराचा अधिकृत ‘ऑपरेशन सिंदूर’ फोटो पोस्ट केलाय.

साऱ्यांचा राग निघाला आफ्रिदीवर

एकीकडे ऑपरेशन सिंदूर ट्रेण्ड करत असताना दुसरीकडे यूजर्स शाहिद आफ्रिदीला ट्रोल करताना दिसले. दहशतवाद्यांनी केलेल्या दुष्कृत्याचे राजकारण करून भारताच्या संरक्षण दलांना लक्ष्य करण्याची पोस्ट त्याने केली होती. त्यामुळे आफ्रिदीच्या नैतिक दृष्टिकोनावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी शिखर धवन आणि इरफान पठाण सारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंनाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केले. कारण यापूर्वी आफ्रिदीच्या चिथावणीखोर वक्तव्यांना या खेळाडुंनी त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. धवन यावेळी गप्प असला तरी त्याने एकदा आफ्रिदीला ‘आधी स्वतःचे अंगण स्वच्छ करा’ असे सांगितले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!