Homeमनोरंजनसुनील गावस्कर यांचे ग्रुप ऑफ डेथ कॉन्ट्रोव्हर्सी सुपर 8 टी20 वर्ल्ड कप...

सुनील गावस्कर यांचे ग्रुप ऑफ डेथ कॉन्ट्रोव्हर्सी सुपर 8 टी20 वर्ल्ड कप 2026 बद्दल मोठे विधान


T20 विश्वचषक 2026 : टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आलीये. ग्रुप स्टेजनंतर आता 12 संघ स्पर्धेच्या बाहेर पडले असून उर्वरित 8 संघांनी सुपर 8 साठी क्वालिफाय केलंय. यात सुपर 8 साठी भारत, इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ क्वालिफाय झालेत. आयसीसीद्वारे अंमलात आणल्या गेलेल्या प्री-सीडिंग फॉरमॅटमुळे चार ग्रुपमधील सर्व विजेता संघ भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेल्या पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड इत्यादींना सामील करण्यात आलंय. या कॉम्बिनेशनमुळे सोशल मीडियावर आयसीसीवर टीका करण्यात आलीये. टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या संघांना ‘ग्रुप ऑफ डेथ’ मध्ये अडकवण्यात आलं असून त्यामुळे दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघांना पुढील सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा रस्ता सोपा झालाय. याबाबत भारताचे दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी वक्तव्य केलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सुनील गावसकर काय म्हणाले?

भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी ‘ग्रुप ऑफ डेथ’ च्या वादावर आपलं मत व्यक्त केलं. यात त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा हा फॉरमॅट निश्चित झाला, मग तेव्हा तुम्ही यावर प्रश्न का उपस्थित केला नाहीत. गावसकरांचंं म्हणणं आहे की हा मुद्दा आता उपस्थित करणं व्यर्थ आहे. त्यांच्यानुसार जर कोणाला या फॉरमॅटबाबत काही वावगं वाटत होतं किंवा आपत्ती होती तर यासंदर्भात पूर्वीच आवाज उठवला गेला पाहिजे होता.  तसेच त्यांनी असे देखील संकेत दिले की आयसीसीकडे या संदर्भात निर्णय घेण्याच्या मागे काही ठोस कारण असतील.

हेही वाचा : IND vs SA Live Streaming : भारत–दक्षिण आफ्रिका सुपर-8 सामना Free मध्ये कुठे पाहायचा? जाणून घ्या

‘हे’ देखील आहे महत्वाचं कारण :

सुनील गावसकर यांनी प्री सीडींगच्या मागे लॉजिस्टिक कारण असू शकतात असं सांगितलाय. सदर स्पर्धा ही दोन देशांमध्ये खेळवली जात असून यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास, वीजा, इमिग्रेशन, कस्टम क्लिअरंस, हॉटेल बुकिंग आणि विमान प्रवास खर्च सारख्या अनेक सुविधांच्या योजना बनवाव्या लागतात. प्रत्येक संघाचा सपोर्ट स्टाफ हा वेगवेगळा असतो, काहींची संख्या जास्त असते. काही संघांना हॉटेलमध्ये 35-40 खोल्यांची गरज असते तर काहींना कमी खोल्या लागतात. त्यामुळे या मोठ्या स्पर्धांमध्ये आयोजकांना मोठी कसरत करावी लागते आणि संघांसाठी हॉटेल आणि प्रवासाची योजना करावी लागते. त्यामुळे गावस्करांचं म्हणणं आहे की या व्यावहारिक कारणांमुळे आयसीसीने प्री सिडींगचा निर्णय घेतला असावा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!