Homeदेश-विदेशमहाराष्ट्र हवामान बातम्या 21 फेब्रु 2026 मुंबई कोकण विदर्भात उष्णतेची लाट अनुभवण्यासाठी...

महाराष्ट्र हवामान बातम्या 21 फेब्रु 2026 मुंबई कोकण विदर्भात उष्णतेची लाट अनुभवण्यासाठी भारतातील 9 राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल हवामान ताजे अपडेट


महाराष्ट्र हवामान बातम्या: फेब्रुवारी महिना अखेरच्या टप्प्यात असतानाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या हवामानाच लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये हवामानाची स्थिती बदलण्यास सुरुवात झाली असून, काही राज्यांमध्ये उकाडा सुरू झाला आहे. तर, महाराष्ट्रासह देशातील काही राज्य मात्र इथं अपवाद ठरताना दिसत आहेत. अर्थात या भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

महाराष्ट्रात उकाडा आणि अवकाळी एकत्रच!

राज्यात प्रामुख्यानं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई आणि नजीकच्या भागांमध्येसुद्धा पावसाची हजेरी असेल असं पूर्वानुमान आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनरांमध्ये पहाटेच्या वेळेसह दिवसासुद्धा दृश्यमानता धुक्यामुळं काही अंशी प्रभावित होताना दिसेल. तर, मुंबईचा पारा 34 ते 35 अंशांदरम्यान असेल. शहरात दमट हवामानामुळं उष्मा अधिक भासेल. कोकण किनारपट्टी, विदर्भातही ही स्थिती असेल असा प्राथमिक अंदाज यंत्रणेनं वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सध्या उकाडा प्रचंड वाढत असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वातावरण कोरडं आणि उष्ण असेल. पुढच्या 24 तासांनंतर हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून, 22 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्रात होरपळ वाढत असून, नागरिकांना प्रचंड उष्णतेचा मारा सहन करावा लागणार आहे. ज्यामुळं नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही कामानिमित्त भर उन्हात घराबाहेर पडायचं झाल्यास योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

9 राज्यांमध्ये तूफान पावसाचा इशारा

फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशात सध्या बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यानं भक्कम स्थिती मिळवली असून, आयएमडीच्या पूर्वानुमानानुसार पुढचे 4 दिवस देशाच्या बहुतांश भागांमध्ये प्रचंड स्वरुपात वादळी पावसामुळं हवामानाचं चक्र बिघडेल असा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारतापासून याची सुरुवात होणार असून, हळुहळू हे वारे मध्य आणि पूर्व भारतावर प्रभाव पाडताना दिसतील.

वाऱ्यांच्या या रचनेमुळं दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळात तूफान पावसाचा अंदाज आगे. तर, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी असेल. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल. पर्वतीय भागांमध्येसुद्धा अचानक तापमानात घट आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे. तर, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांवर मात्र या स्थितीचा फारसा प्रभाव पडणार नाही. आयएडीच्या माहितीनुसार येत्या 16 ते 18 तासांमध्ये जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तमिळनाडू, केरल, अंडमान-निकोबार द्वीप समूह, छत्तीसगढ़, ओडिशा आणि कर्नाटकात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!