दीपक चहर घटस्फोट: क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने आंतरराष्ट्रीय पाळतीवर हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सुद्धा त्यांच्या फॅन्सना खूप उत्सुकतता असते. अशातच आता भारताच्या एका स्टार क्रिकेटरने घटस्फोट घेतल्याची बातमी समोर येतेय. टीम इंडियाचा क्रिकेटर राहुल चहर याने त्याची पत्नी इशानी जौहर हिच्याशी घटस्फोट घेतला आहे. 4 वर्षांपूर्वी 2022 गोवा येथे दोघांनी गोव्यात डिस्टिनेशन वेडिंग केलं होतं. मात्र यांचा संसार फारकाळ टिकू शकला नाही. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्वतः राहुल चहरने याबाबत माहिती दिलीये.
राहुल चहरने घटस्फोटाची घोषणा केली :
राहुलने आपल्या इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली. यात त्याने कन्फर्म केलं की त्यांनी पत्नी इशानी जौहर हिच्याशी घटस्फोट घेतला आहे. 26 वर्षांच्या या क्रिकेटरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आयुष्यात काय हवे आहे हे त्याला कळायच्या आधीच त्याने 22 वर्षांच्या तरुण वयात लग्न केले. नंतर त्याने कधीही अपेक्षा न केलेले धडे घेतले आणि 15 महिने कोर्टात घालवले.
शेवटी pic.twitter.com/KhZKlX8obj
राहुल चहर (rdchahar1) 20 फेब्रुवारी 2026
15 महिने कोर्टात घालवले :
राहुल चहरने पोस्टमध्ये लिहीलं की, ‘स्वतःला, माझे मूल्य किंवा मी खरोखर घडवू इच्छित असलेले जीवन पूर्णपणे समजून घेण्यापूर्वीच, मी कमी वयात लग्न केलं. त्यानंतर मला अशी वर्षे मिळाली ज्यांची मी कधीच अपेक्षा केली नव्हती आणि गेल्या पंधरा महिन्यांत मला असे धडे मिळाले जे मला कोर्टात घालवण्यात आले, ज्यामध्ये मला संयम, धैर्य आणि खरोखरच फार कमी लोकांकडे असलेली ताकद शिकायला मिळाली’.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : 17 वर्षांनंतर पुन्हा तोच धोका! सुपर 8 मध्ये टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; नेमकं संकट काय?
राहुल चहरने पुढे म्हटले की, सध्या आयुष्यातील हा चॅप्टर सध्या न्यायालयाच्याद्वारे बंद झाला आहे. राहुल चहर म्हणाला की हे प्रकरण घटस्फोटाने आता संपलंय, ज्यासाठी त्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. राहुल चहर पुढे म्हणाले की, त्यांनी कोणताही पश्चात्ताप किंवा राग न बाळगता, स्पष्टपणे बोलून त्याच्या जीवनातील हा चॅप्टर संपवला आहे. राहुल चहर म्हणाला की काही नाती कायम टिकण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी असतात.





























