थार दुर्घटना साइनबोर्डमध्ये अडकली: भारतात रोज हजारोंच्या संख्येनं अपघात होतात. काही अपघात इतके विचित्र असतात की ते पाहून हा अपघात नेमका कसा झाला असेल असा प्रश्न पडतो. अशाच एका अपघाताची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. हा व्हिडीओ एका थार कारच्या अपघाताचा आहे. मात्र या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. नक्की हा प्रकार काय आहे पाहूयात…
काय आहे या व्हिडीओमध्ये?
देशभरामध्ये वेगवेगळ्या महामार्गांवर लावल्या जाणाऱ्या फलकांमध्ये शहरं किती दूर आहेत हे दर्शवणारे हिरव्या रंगाचे फलक लावले जातात. या फलकांवर शहरांच्या नावांबरोबरच त्यांचं अंतर दर्शवलेलं असतं. अनेकदा हे रस्त्यांवर कमानीसारखे लावलेले असतात. अशाच एका फलकामध्ये थार गाडी शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत थार कार या साईन बोर्डमध्ये घुसल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक थार वाहन थेट बोर्डवर धडकताना दिसत आहे..!
व्हिडीओ पाहून असे दिसते की हे NH 48 आहे जे दिल्ली, गुडगाव आणि जयपूरकडे जात आहे..!
आजकाल थारच्या वाहन चालकांचे असे कारनामे पाहायला मिळतात…!
कदाचित हे थार वाहन जयपूरच्या दिशेने जात असेल… pic.twitter.com/G3bDZQYIRz
— रमेश मीना (@MeenaRamesh91) 18 फेब्रुवारी 2026
कोणी शेअर केलाय व्हिडीओ आणि काय म्हटलंय?
“हा व्हिडीओ पाहून तो राष्ट्रीय महामार्ग 48 वरील असल्याचं दिसत आहे. हा महामार्ग दिल्ली, गुरुग्रामवरुन जयपूरला जातो,” असं एका युझरने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तसेच, “आजकाल थार गाडी चालवणाऱ्यांचे असेच काही कारनामे पाहायला मिळतात. कदाचित ही थार गाडी जयपुरच्या दिशेने जात होती. मात्र थेट फलकामधील जयपूर लिहिलेल्या ठिकाणीच घुसली,” असं रमेश मिना नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. तसेच त्याने, “या व्हिडीओच्या सत्यतेची मी खात्री देत नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होणं शक्य आहे का?” असंही विचारलं आहे.

या व्हिडीओमागील सत्यता काय?
या पोस्टखाली अनेकांनी ग्रोक या एक्सवरील एआय प्लॅटफॉर्मलाच खरोखर असं काही घडलं आहे का? असा सवाल विचारला. त्यावर ग्रोकने, “हा व्हिडीओ पाहून तो राष्ट्रीय महारमार्ग 48 वर थार गाडी साईनबोर्डमध्ये घुसल्याचं दर्शवणारा असल्याचं वाटतंय. मात्र अशी घटना घडल्याच्या दाव्याला दुजोरा देता येत नाही. हे फोटो आणि व्हिडीओ एआय जनरेटेड वाटतात. कारण अपघातामधील कारची अवस्था पाहता भौकितशास्रानुसार हे असं होणं शक्य वाटत नाही. अशा कोणत्याही अपघाताचा उल्लेख बातम्यांमध्ये नाही. हा कदाचित एखादा व्हायरल विनोद असू शकतो,” असं उत्तर दिलं आहे. “हा फेक एडिटेड व्हिडीओ असून अशा अपघाताही कुठेही नोंद दिसत नाही,” असंही ग्रोकने एका उत्तरामध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नकली म्हणजेच फेक असल्याचं स्पष्ट होत आहे.

त्यामुळेच ही पोस्ट थार चालकांना ट्रोल करण्यासाठी बनवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.




























