Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी भाजपच्या इच्छुकांनी पक्षनिष्ठांना संधी देण्याची मागणी केली पाच नावे आघाडीवर आहेत

राज्यसभेसाठी भाजपच्या इच्छुकांनी पक्षनिष्ठांना संधी देण्याची मागणी केली पाच नावे आघाडीवर आहेत


राज्यसभेसाठी भाजपचे इच्छुक राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामधील महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. यानंतर सर्व पक्षांकडून इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे. भाजपातही अनेक इच्छुकांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. निष्ठावंतांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपातील जुने नेते करत आहेत. ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी न देता, निष्ठावंतांना न्याय दिला जावा असं त्यांचं म्हणणं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग

ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी न देता निष्ठवंतांना न्याय द्या अशी भाजपातील जुन्या नेत्यांची आग्रही मागणी आहे. भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा आहे. यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे.

नाराजांना शांत करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता राज्यसभा आणि परिषदेच्या जागा भरल्या जाणार आहेत. राज्यसभेच्या 7 तर विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत. राज्यपाल नियुक्त 5 जागांवरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यसभा आणि परिषदेवर इच्छूकांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे.

रिक्त जागांपैकी अधिक जागा महायुतीच्या पारड्यात पडणार आहेत. तर संख्याबळाचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. स्थानिक निवडणुकांमधील निराशाजनक कामगिरीमुळे विधान परिषदेच्या जागांवर परिणाम होणार आहे.

असा असेल राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या निवडणुकांसाठी उमेदवारांना 26 फेब्रुवारी पासून अर्ज भरता येणार आहेत. तसेच 5 मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 6 मार्च रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत पार पडणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

भाजपकडून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

दरम्यान, महाराष्ट्र राज्यसभेच्या जागांसाठीचे समीकरण विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार ठरते. सध्याच्या समीकरणानुसार भाजपचा वरचष्मा असून महायुतीला 6 जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याची संधी आहे, तर मविआला एक किंवा दोन जागा मिळवणे आव्हानात्मक आहे. मात्र महायुतीला मिळालेल्या 6 जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये कसे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपकडून अधिकचा उमेदवार न दिल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!