Homeदेश-विदेशCrime News indore mba खून प्रकरणातील गुन्हेगार पियुष धामनोतियाचा पत्रकारांशी संवादाचा व्हिडिओ

Crime News indore mba खून प्रकरणातील गुन्हेगार पियुष धामनोतियाचा पत्रकारांशी संवादाचा व्हिडिओ


Crime News MBA खून प्रकरण: मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका तरुणीची तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी आणि मयत तरुणी हे दोघेही एमबीएचं शिक्षण घेत होते. प्रेयसीने बरं वाटत नसल्याने सेक्ससाठी नकार दिल्याने आरोपीने हातपाय बांधून तिच्या छातीवर बसून गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने प्रेयसीच्या छातीत एवढ्या जोरात चाकू खुपसला की चाकू तुटला. त्यानंतर आरोपीने प्रेयसीच्या मृतदेहाच्या बाजूला बसून दारु प्यायली आणि मृतदेहासोबत लैंगिकसंबंध ठेवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पियूष धनोतिया या तरुणाला अटक केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तुम्ही जाणून काय करणार?

मध्य प्रदेश पोलीस सध्या प्रकरणाची चौकशी करत असून पियूष धनोतियाला घेऊन पोलीस घटनास्थळावर घटनाक्रम रिक्रिएट करण्यासाठी पोहोचले. यावेळी पियूष धनोतियाला पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांची उत्तर देण्यास त्याने नकार दिला. आपल्या प्रेयसीला का मारलं असं विचारलं असता पियूषने पत्रकारांनाच, ‘तुम्ही हे जाणून काय करणार?’ असा प्रतिप्रश्न केला. पत्रकारांनी परत प्रश्न विचारला असता, “काही नाही झालंय, जाऊ द्या… जे झालं ते झालं… जाऊ द्या ना… काय करणार तुम्ही हे जाणून?” असं पियूष म्हणाला.

पश्चाताप होत नाही का?

पत्रकारांनी पियूषला तू जे केलं त्याचा पश्चाताप होत नाही का? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून पियूषने, “मी योग्य वेळी सर्व काही सांगेन” असं उत्तर दिलं. सीन रिक्रिएट करताना पियूष शांत होता. मात्र चौकशीदरम्यान पियूषचं वागणं हे फारच विचित्र असतं, असं पोलिसांनी सांगितलं. हत्या केल्यानंतर आरोपी पियूषने माफी मागितली होती. त्याने प्लॅनचीटच्या माध्यमातून आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एक साधा कागद मागितला अन्…

पियूषने ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या करण्याचा विचार केला होता असं चौकशीमध्ये समोर आलं आहे. मात्र त्याने आपला निर्णय बदलला. चौकशीदरम्यान पियूषने एक साधा कागद मागितला. त्यावर त्याने, “माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मला मरायचं आहे,” असं लिहिलं. आरोपी पियूष विक्षिप्तासारखा वागत असून तो त्याच्या प्रेयसीला भेटू द्या अशी विनंती पोलिसांना करत आहे. मी अजूनही तिच्यावर प्रेम करतो, मला तिला भेटू द्या असं पियूष पोलिसांना सांगतोय.

प्रेयसीबद्दल पझेसिव्ह होता आरोपी

डीसीपी कृष्ण लालचंदानी यांनी आरोपीने जादू-टोण्यासंदर्भातील व्हिडीओ पाहिला होता अशी माहिती दिली. त्याने इंटरनेटवर आत्महत्या करण्याच्या पद्धतींबद्दल सर्च केल्याचंही तपासात समोर आलं आहे. मात्र त्याने कधीच स्वत:ला कोणत्याही पद्धतीची इजा करुन घेतली नाही. तपासादरम्यान पियूषने त्याला त्याच्या प्रेयसीवर ती दुसऱ्या कोणाशी तरी बोलते असं वाटत असल्याने ती फसवणूक करेल अशी भीती वाटत होती असंही समोर आलं आहे.

मुंबईतून आरोपीला अटक

13 फेब्रुवारीला एमबीएच्या या विद्यार्थिनीचा मृतदेह पियूषच्या खोलीमध्ये सापडला होता. प्रेयसीची हत्या केल्यानंतर पियूष ट्रेनने मुंबईला पळून आला. इंदौर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!