Homeमनोरंजनइरेक्टाइल डिसफंक्शनचा लैंगिक जीवनाशी संबंध नाही तो थेट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या जोखमीशी...

इरेक्टाइल डिसफंक्शनचा लैंगिक जीवनाशी संबंध नाही तो थेट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या जोखमीशी जोडला जातो.

इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजेच शारीरिक संबंधादरम्यान पुरुषांमध्ये लिंगाची ताठरता ने येणे. अनेक पुरुषांसाठी ही एक लाजिरवाणी किंवा वैयक्तिक समस्या मानली जाते. मात्र तज्ज्ञांच्या मते ही समस्या केवळ लैंगिक आरोग्यापुरती मर्यादित नसून ती हृदयविकाराचा सुरुवातीचा इशारा देखील असू शकते. याबाबत  डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डियाक सर्जन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हृदय आणि लैंगिक अवयवांपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य एकमेकांशी संबंधित असते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे, कोलेस्ट्रॅाल वाढणे किंवा रक्तप्रवाह कमी होणे यामुळे आधी इरेक्टाइल डिसफंक्शन दिसून येते आणि पुढे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. बदलती जीवनशैली, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा हे इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि हृदयविकार दोन्हींसाठी प्रमुख कारणीभूत  घटक मानले जातात. अनेकदा पुरुष छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याआधीच लैंगिक समस्या अनुभवतात मात्र ते याकडे दुर्लक्ष करतात.

वैद्यकीय अभ्यासानुसार, इरेक्टाइल डिसफंक्शनची लक्षणे दिसल्यानंतर पुढील 3 ते 5 वर्षांत हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन  ही एक धोक्याची घंटा मानली जाते. लैंगिक उत्तेजना आणि हृदयाचे ठोके यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. लैंगिक उत्तेजना होत असताना लिंगाकडे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि यासाठी हृदयाची कार्यक्षमता आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या या एकाच रक्ताभिसरण व्यवस्थेचा भाग आहेत.

म्हणूनच जर हृदयात काही बिघाड असेल, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असतील किंवा रक्तप्रवाह कमी होत असेल, तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लैंगिक क्षमतेवर दिसून येतो. अनेक वेळा हृदयविकाराची लक्षणे दिसण्याआधीच लैंगिक समस्या जाणवू लागतात. यामुळेच या विषयाची योग्य आणि वेळेवर माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या यावर विविध वैद्यकीय संशोधन सुरू असल्याने, लैंगिक आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य यांचा संबंध अधिक स्पष्ट होत आहे. या संशोधनामुळे जनजागृती वाढत असून, पुरुषांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असा संदेश दिला जात आहे.

तज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की, लैंगिक समस्या जाणवत असल्यास त्याबाबत लाज न बाळगता आणि दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच तपासणी केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण, धूम्रपान टाळणे आणि नियमित आरोग्य तपासणी या सवयी केवळ लैंगिक आरोग्यच नव्हे तर हृदय निरोगी ठेवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
spot_img

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
error: Content is protected !!