HomeमनोरंजनAI मुळे नोकऱ्या कमी होतील की वाढतील? Infosys ने दिले स्पष्ट संकेत,...

AI मुळे नोकऱ्या कमी होतील की वाढतील? Infosys ने दिले स्पष्ट संकेत, ‘भविष्यात…’


इन्फोसिस इन्व्हेस्टर एआय डे: आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे नोकऱ्या कमी होतील की वाढतील, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी Infosys पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंपनीच्या Investor AI Day कार्यक्रमात भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगार याबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले. AI चा वेग आधीपेक्षा खूप जास्त असल्यामुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांवर त्याचा मोठा परिणाम दिसणार आहे. Infosys चे चेअरमन नंदन नीलेकणि यांनी काय सांगितले पहा…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

इन्फोसिस इन्व्हेस्टर एआय डे वर मोठी घोषणा
मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमामुळे कंपनी गुंतवणूकदारांच्या विशेष लक्षात आली. कारण Infosys ने अमेरिकेतील प्रगत AI कंपनी Anthropic AI सोबत भागीदारी जाहीर केली. या बातमीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आणि Infosys Share Price मध्ये वाढ नोंदवली गेली. कंपनीने सांगितले की AI हे पुढील काळात व्यवसाय वाढीचे मुख्य साधन बनणार आहे.

नंदन नीलेकणि यांचे मत
कार्यक्रमात बोलताना नंदन नीलेकणि म्हणाले की प्रत्येक तांत्रिक क्रांतीमुळे सुरुवातीला भीती निर्माण होते. मात्र शेवटी त्या बदलातून अधिक संधी तयार होतात. AI काही पारंपरिक कामे कमी करेल, पण त्याच वेळी मोठ्या प्रमाणात नवीन करिअर मार्गही उघडेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बदल स्वीकारून कौशल्य वाढवणे आवश्यक आहे.

IT क्षेत्रात AI मुळे होणारे बदल
कंपनीच्या सादरीकरणात सांगण्यात आले की जगभरातील अनेक कंपन्या त्यांच्या IT बजेटपैकी 60 ते 80% खर्च जुनी लेगेसी सिस्टीम चालवण्यात करतात. ही व्यवस्था महाग आणि संथ आहे. AI च्या मदतीने ही प्रणाली वेगाने आधुनिक करता येते. त्यामुळे खर्च कमी होईल, कामाचा वेग वाढेल आणि उत्पादकता सुधारेल. Infosys च्या Q3 निकालात AI सेवा 5.5% महसूल देत असल्याचेही समोर आले आहे.

नोकऱ्यांवर होणारा परिणाम
AI मुळे ऑटोमेशन वाढत असल्याने coding, testing आणि support सारखी पुनरावृत्तीची कामे मशीन करू लागली आहेत. अंदाजानुसार सुमारे 9.2 कोटी पारंपरिक IT नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. Front-end developers, QA testers, IT support specialists आणि blockchain developers हे रोल विशेष प्रभावित होतील.

हे ही वाचा: YouTube बंद! सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील लाखो युजर्स टेन्शनमध्ये; काय आहे कारण?

नवीन रोजगार संधी वाढणार
तथापि दुसरीकडे AI मुळे मोठ्या प्रमाणात नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत. अंदाजे 17 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. Data annotator, AI engineer, AI forensic analyst, Forward deployed engineer आणि AI leads यांसारख्या भूमिका वाढतील. या क्षेत्रात अधिक कौशल्य आणि जास्त पगाराच्या संधी असतील. त्यामुळे IT उद्योग कमी होत नाही, तर नव्या स्वरूपात विकसित होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!