Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या बारामतीत प्रथम 9100000000000 रुपयांची गुंतवणूक पुण्यातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात...

अजित पवारांच्या बारामतीत प्रथम 9100000000000 रुपयांची गुंतवणूक पुण्यातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या AI डेटा सेंटरमध्ये अदानी ग्रुपने डेटा सेंटर्स बनवले


अदानी समूह डेटा केंद्रे तयार करण्यासाठी 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा महाकुंभ अर्थात “एआय इम्पॅक्ट समिट 2026” चा शुभारंभ झाला आहे. जगभरातील IT आणि टेक कंपन्यांचे दिग्गज यात सहभागी झाले आहेत. जगभरात AI क्रांती झाली आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. अशातच  भारतातील दुसरे मोठे AI डेटा सेंटर पुण्यात उभारले जाणार आहे. या डेटा सेंटरसाठी 9100000000000 रुपयांची महागुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील पहिले AI डेटा सेंटर पुण्यातच आहे.  अजित पवार यांच्या बारामतीत हे डेटा सेंटर आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

28 डिसेंबर 2025 रोजी बारामतीत उभारले पहिले सेंटर

बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरचे 28 डिसेंबर 2025 रोजी उद्घाटन झाले. बारामतीत शरद पवार , अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचं उद्योगपती गौतम अदानी यांनी उदघाटन केले. आमदार रोहित पवार यांनी यावेळी अदानी यांच्या कारचे सारथ्य केले. अजित पवारांनी यावेळी बारामतीच्या शैक्षणिक हबची माहिती दिली होती.

अदानी समूहाने भारतात मोठे AI डेटा सेंटर आणि AI सिटी उभारण्याची घोषणा केली आहे.   जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा-संगणक प्रकल्पात  अदानी समूहाने 9.1 लाख कोटी रुपयांच्या थेट गुंतवणूकीची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत भारतात डेटा सेंटर्स उभारण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या डेटा सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे हे डेटा सेंटर अक्षय ऊर्जेवर चालतील. एआय तंत्रज्ञानाने सज्ज असतील.

भारताला एआय क्रांतीची प्रमुख शक्ती केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. देशाला ऊर्जा आणि संगणनात स्वावलंबी बनण्यासाठी हे सेंटर मह्तवपूर्ण भूमिका बजावणार आहे. 100 अब्ज डॉलर्सच्या या गुंतवणुकीमुळे 2035 पर्यंत सर्व्हर उत्पादन, वीज पायाभूत सुविधा, स्वतःच्या क्लाउड प्लॅटफॉर्मचा विकास आणि इतर संबंधित उद्योगांमध्ये अंदाजे 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

250 अब्ज डॉलर्सची एआय पायाभूत सुविधा

पुढील दहा वर्षांत, भारतात 20.8 लाख कोटींच्या  एआय पायाभूत सुविधांची परिसंस्था असतील. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी या प्रोजेक्टची घोषणा केली. जगात AI क्रांती होत आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतात लक्षवेधी AI क्रांती घडवून आणण्याचे उद्दीष्ट आहे. अदानी समूह त्यांच्या विद्यमान डेटा सेंटर आणि ग्रीन एनर्जी अनुभवाचा वापर करून संपूर्ण पाच-स्तरीय एआय स्टॅकमध्ये विस्तार करत आहे. भारताचे तांत्रिक सार्वभौमत्व मजबूत करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे अदानीकनेक्सचे सध्या कार्यरत असलेले 2 गिगावॅट (GW) राष्ट्रीय डेटा सेंटर 5 गिगावॅट (GW) पर्यंत वाढेल, ज्यामुळे भारत जागतिक एआय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येईल.

‘या’ शहरांमध्ये एआय कॅम्पस उभारणार

भारतात AI सिटी उभारण्यासाठी गुगलसोबत एक मोठी भागीदारी करण्यात आली आहे. यामुळे विशाखापट्टणममध्ये देशातील सर्वात मोठे गिगावॅट-स्केल एआय डेटा सेंटर कॅम्पस उभारले जाणार आहे. नोएडामध्येही असेच कॅम्पस स्थापन केले जातील. हैदराबाद आणि पुण्यात मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने डेटा सेंटर उभारले जाणार आहेत.
अदानी समूह भारतात मोठ्या प्रमाणात AI कॅम्पस निर्माण करण्याचा विचार करणाऱ्या इतर प्रमुख कंपन्यांशीही चर्चा करत आहे. यामुळे भारतातील आघाडीचे एआय इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत होणार आहे. अदानी समूह फ्लिपकार्टसोबतची डेटा सेंटर भागीदारी आणखी मजबूत करणार आहे. ही भागीदारी फ्लिपकार्टच्या पुढील पिढीतील डिजिटल कॉमर्स, उच्च-कार्यक्षमता संगणन आणि मोठ्या प्रमाणात एआय वर्कलोड्सना समर्थन देण्यासाठी दुसऱ्या एआय डेटा सेंटरच्या विकासाला समर्थन देणार आहे. 5 गिगावॅट (GW) क्षमता जगातील सर्वात मोठी एकात्मिक डेटा सेंटर प्लॅटफॉर्म तयार करेल, ज्यामध्ये अक्षय ऊर्जा निर्मिती , ट्रान्समिशन पायाभूत सुविधा आणि हायपरस्केल एआय कंप्यूट एकाच समन्वित आर्किटेक्चरमध्ये एकत्रित केले जाईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!