Homeसांस्कृतिकWhen is First Surya Grahan 2026 Date Time Visible in India or...

When is First Surya Grahan 2026 Date Time Visible in India or Not Zodiac Signs Impacts Full Details | कधी आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण? सुतक काळ पाळावा की नाही? कोणत्या राशीवर होणार परिणाम? सर्व प्रश्नांची एकाच बातमीत


सूर्यग्रहण 2026: फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा एक खास खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी 2026 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण असणार आहे. जे कुंभ राशीमध्ये होणार आहे. यावेळी सूर्य कुंभ राशीत असेल, ज्यामुळे ही एक विशेष ज्यातिषीय घटना मानली जात आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते आणि सूर्याचा अंशतः भाग झाकला जातो. या घटनेलाच सूर्यग्रहण असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हाही हे सूर्यग्रहण लागणार असते तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, हे ग्रहण भारतातून दिसेल का? सुतक काळ पाळावा लागणार का? तसेच राशींवर याचा कोणता परिणाम होणार? चला तर मग सदर बातमीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सूर्यग्रहणाची वेळ काय? ‘रिंग ऑफ फायर’ भारतात दिसणार का?

17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणारे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होणार आहे. तसेच संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी मध्यम अवस्थेत पोहोचेल. या सूर्यग्रहणाचे समापन संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी समाप्त होईल. दरम्यान वेळेनुसार या सूर्यग्रहणाचा प्रभाव 4 तास 32 मिनिटांपर्यंत राहिल. सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही म्हणून कोणताही सुतक काळ पाळण्याची आवश्यकता नाही.

कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार

हे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे. कंकणाकृती ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, परंतु सूर्याची कडा एखाद्या वलयासारखी दिसते. चंद्राचा आकार सूर्यापेक्षा लहान असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. परिणामी सूर्याचा मध्यभाग चंद्राने झाकला गेला असल्यामुळे फक्त सूर्याच्या कडांचा प्रकाश दिसतो. ज्यामुळे एक तेजस्वी प्रकाशवर्तुळ तयार होते. ज्याला ‘रिंग ऑफ फायर’ असेही म्हटले जाते.

भारतातून नाही तर, या देशांतून दिसणार सूर्यग्रहण

तसेच मंगळवारी लागणारे हे सूर्यग्रहण भारतातून दिसत नसले तरी प्रामुख्याने; अंटार्क्टिका, दक्षिण अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागातून दिसणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने भारतात नियम पाळले जाणार नाहीत. पण सदर देशांमध्ये राहत असलेल्या भारतीयांना स्थानिक वेळ लक्षात घेऊन ज्योतिषशास्त्रीय नियमांचे पालन करावे.

कुंभ राशीच्या व्यक्तींवर होणार परिणाम

सूर्यग्रहण कुंभ राशीत असल्यामुळे 17 फेब्रुवारीचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणानंतर जवळजवळ 30 दिवसांपर्यंत कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. विशेषतः पैशांचा मोठा व्यवहार किंवा जमीन व्यवहारात गुंतवणूक करणे टाळावे. असा सल्ला दिला गेला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!