HomeमनोरंजनT20 World Cup 2026 कोलंबो एअर तिकिटाची किंमत आणि हॉटेलच्या किमतीत भारत...

T20 World Cup 2026 कोलंबो एअर तिकिटाची किंमत आणि हॉटेलच्या किमतीत भारत विरुद्ध पाक सामन्यामुळे वाढ


भारत विरुद्ध पाक : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे टी 20 क्रिकेटमधील (T20 Cricket) ग्रुप स्टेजचा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं असून या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहित आहेत.  काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताविरुद्ध होणाऱ्या या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने हा सामान होणार की नाही यावर शंकेचे ढग होते, मात्र आयसीसी सोबत झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास होकार दिलाय. श्रीलंकेतील कोलंबो येथे रविवारी भारत – पाकिस्तान सामना होणार असून हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी क्रिकेट रसिक उत्साहित आहेत. त्यामुळे अनेकजण कोलंबोसाठी रवाना होत आहेत. मात्र यामुळे कोलंबोला जाणाऱ्या विमान प्रवासाचं तिकीट महागलं असून याची किंमत लाखांच्या घरात पोहोचलीये.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोलंबोला जाणाऱ्या विमानाचं तिकीट लाखोंच्या घरात :

जर तुम्ही शेवटच्या क्षणी दिल्ली वरून कोलंबो येथे जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. दिल्लीहून कोलंबोला जाणाऱ्या विमानाचं राउंड ट्रिप तिकीट हे 90,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर मुंबईवरून जायचं असेल तर यासाठी प्रवाशांना तब्बल 70,000 रुपये खर्च करावे लागतील. तर चेन्नई किंवा कोची वरून कोलंबोला जाणाऱ्या तिकीटाची किंमत जवळपास 50,000 रुपये आहे. विशेषतज्ज्ञांचं म्हणणं आहे की 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ही सामान्य दिवसांच्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढली आहे. कोलंबोच्या बुकिंगमध्ये सुमारे 65 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे, जी या सामन्याची लोकप्रियता दर्शवते.

हॉटेल सुद्धा हाऊसफुल्ल :

भारत – पाकिस्तान सामन्यामुळे फक्त विमानाचं तिकीट नाही तर कोलंबोमधून हॉटेलचे रेट सुद्धा वाढले आहेत. कोलंबो शहरातील प्रमुख आणि प्रीमियम हॉटेलच्या बुकिंगमध्ये  35 टक्क्यांची वाढ झाली आहे. श्रीलंकेचा व्हिसा-मुक्त प्रवेश भारतीय पर्यटकांसाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरत आहे, कारण लोक कोणत्याही लांब कागदपत्रांशिवाय अचानक सहलींचे नियोजन करतायत. ट्रॅव्हल एजन्सींच्या मते, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. कोलंबोमधील राहण्याची जागा भरलेली असल्याने, चाहते आता गॅले आणि कॅंडी सारख्या जवळच्या शहरांमध्ये राहण्याचा पर्याय शोधत आहेत.

हेही वाचा : IND VS PAK : टीम इंडिया पाकिस्तानी खेळाडूंशी हॅन्डशेक करणार का? कॅप्टन सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं

कसा आहे भारत – पाकिस्तानचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 13 टी 20 सामने खेळवण्यात आले. यापैकी 9 सामन्यात भारताने तर 3 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवलाय. तर आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ 8 वेळा आमने सामने आले तर यापैकी 7 वेळा भारताने पाकिस्तानवर तर एकदा पाकिस्तानने भारतावर विजय मिळवलाय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!