Homeदेश-विदेशव्हायरल बातम्या भोपाळ जुदाई प्रकार वास्तविक जीवन कथा घटस्फोट प्रकरण

व्हायरल बातम्या भोपाळ जुदाई प्रकार वास्तविक जीवन कथा घटस्फोट प्रकरण


भोपाळ जुदाई प्रकार वास्तविक कथा: कोणतीही कलाकृती किंवा चित्रपट (चरित्रपर सिनेमा वगळता) सादर करण्यापूर्वी त्याच्या कथानकाला अनुसरून एक टीप दिली जाते. सदर कलाकृती पूर्णपणे काल्पनिक असून, वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही, ही ओळ Desclaimer मध्ये सर्वांचच लक्ष वेधते. पण, याच काल्पनिक कलाकृतीचा संदर्भ प्रत्यक्ष जीवनात आढळला तर? जरा वेगळंच वाटेल ना? भुवया उंचावतील, वगैरे वगैरे…. पण, प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे आणि सध्या देशभरात या घटनेची चर्चासुद्धा सुरू आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

विश्वास बसत नाहीये? पाहा काय घडलं…

मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमधील कुटुंब न्यायालयात नुकतंच एक विचित्र प्रकरण समोर आलं ज्यामुळं एकाएकी 90 च्या दशकातील लोकप्रिय ‘जुदाई’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली. नाती, पैसा आणि भावनांची गुंतागुंत याभोवती हे प्रकरण फिरत असून, यामध्ये एका कुटुंबानं आपणहून या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. बरं, यामध्ये एक प्रचंड मोठा आर्थिक व्यवहारही कायद्याच्या चौकटीत राहून झाला, ज्यामुळं सर्वाच्याच नजरा या प्रकरणाकडे वळल्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

हे प्रकरण केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या 42 वर्षीय अधिकाऱ्यांशी संबंधित असून, आपल्या सहकाऱ्यासोबत असणाऱ्या प्रेमसंबंधांमुळं ते चर्चेत आलं. कारण, सहकारी त्यांच्याहून वयानं 12 वर्षे मोठ्या असल्याचं म्हटलं गेलं. म्हणजेच त्यांचं महिला अधिकाऱ्यांचं वय आहे 54 वर्षे. महिला अधिकारी आणि सोबतच्या कर्मचाऱ्यासोबतचं प्रेमाचं नातं दिवसागणिक आणखी दृढ झालं आणि अधिकाऱ्याचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. पत्नी आणि दोन मुलींसोबतच्या नात्यात दुरावा आला, दर दिवशी भांडणं होऊ लागली, घरातलं वातावरण बिघडून कुटुंबकलहानं डोकं वर काढलं.

रोजच्या भांडणाचा परिणाम या कर्मचाऱ्याच्या मुलींवर पला. आई- वडिलांमधील वादामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्यास सुरुवात झाली. मात्र, 16 वर्षांच्या मोठ्या मुलीनं हा वाद थेट न्यायालयात नेला. न्यायालयीन समुपदेशनादरम्यान आपण पत्नीसोबतच्या नात्यात आनंदी नसल्याचं पतीनं स्पष्ट करत आपल्या महिला सहकाऱ्यासमवेत मानसिक शांतता मिळत असल्याचंही यादरन्यान सांगितलं. इथंच एका नात्यात सारंकाही संपल्याचं अधोरेखित झालं आणि पत्नीनं एक व्यावहारिक मार्ग निवडला.

पत्नीनं घेतला मोठा निर्णय

मुलींच्या भविष्यासाठी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी महिलेनं चांगलं ड्युप्लेक्स घर, 27 लाख रुपये रोकड अशी मागणी केली. मुलींचं भविष्य आणि त्यांच्या शिक्षणासाठी ही मागणी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे पतीच्या प्रेयसीनं या अटी स्वीकारल्या. आपल्यामुळं कोणत्याही कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये असं आपल्याला वाटतं असं म्हणत महिलेनं प्रियकरासाठी आपल्याकडे असणारी मोठी रक्कम पुढे केली.

नात्यांमध्ये असा दुरावा येणं म्हणजे… समुपदेशक काय म्हणतात?

समुपदेशकांच्या मते जेव्हा एखाद्या नात्यात भावना कमी होतात तेव्हा फक्त तणाव उरतो. अशा स्थितीत बळजबरीनं एकत्र राहण्यापेक्षा परस्पर सामंजस्यानं विभक्त होणं हाच एकमेव योग्य पर्याय असतो. वरील प्रकरणामध्येसुद्धा दोन्ही पक्षांनी समजुतदारपणा दाखवत असाच मार्ग निवडला. समाजात या प्रकरणाची बरीच चर्चा झाली, किंबहुना काहींनी हा पूर्णपणे व्यावहारिक निर्णय असल्याचं म्हटलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!