Homeदेश-विदेशदुबईस्थित भारतीय करोडपती सतीश सानपाल दरवर्षी नेटफ्लिक्सचा ट्रेलर रिॲलिटी शो देसी ब्लिंग...

दुबईस्थित भारतीय करोडपती सतीश सानपाल दरवर्षी नेटफ्लिक्सचा ट्रेलर रिॲलिटी शो देसी ब्लिंग पत्नीसाठी ३ किलो सोने खरेदी करतात.


भारतीय करोडपती पत्नीसाठी दरवर्षी ३ किलो सोने खरेदी करतात: नेटफ्लिक्सच्या ‘देसी ब्लिंग’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या रिअॅलिटी शोमध्ये भारतीय वंशाचे कोट्यधीस सतीश सानपाल यांच्या पत्नी तबिंदा सानपाल सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या ट्रेलरमध्ये तबिंदा यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. सतीश यांना सोनं किती आवडत याबद्दल तबिंदा बोलत होत्या त्यावेळी त्यांनी एक सर्वांच्या भुवया उंचावणारं विधान केलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हा कार्यक्रम आहे तरी काय?

नेटफ्लिक्सच्या या आगामी रिअॅलिटी शोमध्ये दुबईतील उच्चभ्रू भारतीय आणि त्यांच्या भव्य जीवनशैलीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश सहभागी झाले असून डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रिझवान साजन आणि अॅनाक्स होल्डिंगचे संस्थापक सतीश सानपाल यांसारख्या प्रमुख व्यावसायिक व्यक्तीही कार्यक्रमात त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलताना दिसणार आहेत.  ट्रेलरमधून कार्यक्रमात नेमकं काय पाहायला मिळणार आहे हे दाखवण्यात आलं आहे. दुबईतील उच्चभ्रू भारतीयांच्या अतीश्रीमंत जीवनशैलीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

प्रत्येक वाढदिवसाला 3 किलो सोनं

ट्रेलरमधील भारतीय वंशाचे कोट्यधीश उद्योगपती सतीश सानपाल यांच्या पत्नी तबिंदा सानपाल या त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलताना दिसतात. “सतीशला सोने खरेदी करायला आवडते. तो माझ्यासाठी दरवर्षी 3 किलो सोने खरेदी करतो,” असा खुलासा तबिंदा यांनी केला आहे.

सध्याच्या दरानुसार किती किंमतीचं झालं हे सोनं?

सध्याच्या दरांनुसार एक किलो सोन्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच तीन किलो सोन्याचा सध्याचा दर पाहिल्यास दरवर्षी सतीश त्यांच्या पत्नीला साडेचार कोटी रुपयांपेक्षा अधिकचं सोनं खरेदी करुन देतात.

सतीश आणि तबिंदा सानपाल कोण आहेत?

भारतीय वंशाचे सतीश सानपाल हे अ‍ॅनाक्स होल्डिंगचे अध्यक्ष आहेत. दुबईतील रिअल इस्टेट, आर्थिक बाजारपेठ, हॉस्पिटॅलिटी आणि मीडिया अशा अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे.

मुलीला भेट केलेली आलिशान गाडी

सतीश यांचं लग्न ब्रिटिश-पाकिस्तानी महिलेशी झाले आहे. त्यांना इसाबेला नावाची एक वर्षाची मुलगी आहे. सतीश सानपाल यांनी 2025 च्या सुरुवातीला त्यांच्या मुलीला पहिल्या वाढदिवसानिमित्त कस्टम मेड गुलाबी रोल्स रॉयस भेट दिली होती. त्यांनी भेट दिलेल्या कारचा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरला होता.

खिशात 80 हजार घेऊन दुबईला

गेल्या वर्षी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत, सतीश सानपाल यांनी असा खुलासा केला होता की त्यांचा जन्म भरातातील जबलपूरमध्ये झाला. ते काही दशकांपूर्वी खिशात फक्त 80 हजार रुपये असताना दुबईला आले होते. त्याच मुलाखतीत, तबिंदाने असेही उघड केले होते की ती मुस्लिम आहे आणि सतीश हिंदू आहे. याच कारणामुळे सुरुवातीला तिचे कुटुंब त्यांच्या नात्याचं समजल्यानंतर नाराज होते. मात्र, सतीश यांना उद्योग जगतामध्ये यश आणि श्रीमंती मिळाल्याने त्यांचे मत बदलले. “सतीश त्याच्या कारकिर्दीत जसजसे वर जात होता तसतसे मी सर्वांचे वर्तन बदलताना पाहिले आहे. ते सर्वजण सतीशला भेटण्यासाठी आम्हाला फोन करू लागले,” असं ताबिंदा यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!