Homeदेश-विदेशFamily of Indian student jahanvi kundla killed by US Police officer gets...

Family of Indian student jahanvi kundla killed by US Police officer gets now will get 260 crore settlement from gov | 262 कोटी रुपयांची नुकसानभरपाई… भारतीय कुटुंबाला अमेरिकी पोलीस का देणार इतका पैसा? समोर आलं हादरवणारं कारण


भारतीय विद्यार्थिनी जाह्नवी कुंडलाची अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली: अमेरिकेतील सिएटल येथे 2023 मध्ये घडलेल्या अपघातात भारतीय विद्यार्थिनी जाह्नवी कंडुला हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिच्या कुटुंबाला सुमारे 262 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांमध्ये ही रक्कम अमेरिकेच्या इतिहासातील मोठ्या नुकसानभरपाईंमध्ये गणली जात आहे. 23 वर्षीय जाह्नवी भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. ती सिएटलमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टीम्समध्ये मास्टर्स करत होती. तिथेच तिचा मृत्यु झाला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकं काय घडलं?

जानेवारी 2023 मध्ये ही घटना घडली. सिएटल पोलिस विभागातील अधिकारी केविन डेव हे ड्रग ओव्हरडोज संदर्भातील आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देण्यासाठी जात होते. ज्या परिसरात वेगमर्यादा 25 मैल प्रतितास होती, त्या ठिकाणी ते सुमारे 74 मैल प्रतितास (अंदाजे 119 किमी/तास) वेगाने वाहन चालवत होते. गाडीवरील इमर्जन्सी लाईट्स सुरू होत्या आणि सायरनही वाजत होता, तरीही क्रॉसवॉकवरून रस्ता ओलांडणाऱ्या जाह्नवीला वाचवता आले नाही.या प्रकरणानंतर अधिकाऱ्यावर निष्काळजी वाहनचालकतेबद्दल 5,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि त्यांची नोकरीही काढण्यात आली. मात्र, किंग काउंटीच्या अभियोजकांनी गंभीर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही, कारण जाणूनबुजून सुरक्षेची पायमल्ली केल्याचे ठोस पुरावे आढळले नाहीत.

बॉडी कॅमेरा व्हिडीओमुळे संताप

प्रकरण अधिक वादग्रस्त ठरले ते दुसऱ्या अधिकारी डॅनियल ऑडरर यांच्या बॉडी कॅमेरा रेकॉर्डिंगमुळे. त्या व्हिडीओमध्ये ते हसत-हसत जाह्नवीच्या आयुष्याची ‘मर्यादित किंमत’ असल्याचे म्हणताना ऐकू येतात आणि “फक्त एक चेक लिहून द्या” असं बोलताना ऐकायला येते. या वक्तव्यामुळे मोठा संताप व्यक्त झाला. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील नागरी देखरेख समितीने म्हटले की, अशा वक्तव्यांमुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आणि जनतेचा विश्वास डळमळीत झाला.

न्यायालयात तडजोड प्रस्ताव

गेल्या शुक्रवारी किंग काउंटी सुपीरियर कोर्टात नुकसानभरपाईसंदर्भातील तडजोड प्रस्ताव दाखल करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी ही बातमी प्रथम प्रसिद्ध केली. कुटुंबाच्या वकिलांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शहराच्या अटर्नी एरिका इव्हान्स यांनी म्हटले की, “जाह्नवी कंडुला यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक होता. हा आर्थिक समझोता कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे.”

ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर पोलिस जबाबदारी आणि सार्वजनिक विश्वास या व्यापक मुद्द्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!