Homeमनोरंजनरणवीर आणि रोहित शेट्टी नंतर सलमानच्या नातेवाईकाला आली लॉरेन्स गँगकाढून धमकी !

रणवीर आणि रोहित शेट्टी नंतर सलमानच्या नातेवाईकाला आली लॉरेन्स गँगकाढून धमकी !


मंगळवारी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता सलमान खानच्या एका नातेवाईकाला कोट्यवधी रुपये न दिल्यास जीवाला धोका असेल, अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी घडल्याचे समजते. आजतकच्या वृत्तानुसार, सलमानच्या जवळच्या नातेवाईकाला ईमेलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, कोट्यवधी रुपयांची मागणी पूर्ण केली नाही तर त्यांचा जीव धोक्यात असेल. सध्या या नातेवाईकाचे नाव स्पष्ट नाही, परंतु वृत्तानुसार तो चित्रपटसृष्टीशी संबंधित असून अभिनेता आहे. अद्याप पोलीस याप्रकरणी तक्रार दाखल झालेली नाही.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रणवीर सिंहला व्हॉट्सॲपद्वारे धमकी

सलमानच्या नातेवाईकापूर्वीच मंगळवारी रणवीर सिंहला धमकी मिळाली होती. पोलीस सूत्रांनुसार, रणवीरला ही धमकी व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोटद्वारे पाठवण्यात आली. नोटमध्ये म्हटले होते की, जर कोट्यवधी रुपये दिले नाहीत, तर त्याच्या जीवाला धोका आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी रणवीरच्या वांद्रे येथील घराची सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचने व्हॉइस नोट पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाशी संबंध तपासले जात आहेत

यापूर्वी, 31 जानेवारी रोजी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर ४-५ राऊंड गोळीबाराची घटना घडली होती. पोलीस आता तपासत आहेत की, रणवीरला मिळालेल्या धमकीचा रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराशी थेट संबंध आहे की ही फक्त भीती पसरवण्याची योजना आहे. तपासात असे उघड झाले आहे की, या गोळीबारात रोहित शेट्टीच हल्लेखोरांचे मुख्य लक्ष्य होते. या प्रकरणात पोलिसांनी 5 फेब्रुवारी रोजी आरोपी आसाराम फसाळेला अटक केली होती.

लॉरेन्स गँग आणि आरोपींची पार्श्वभूमी

पोलिसांच्या तपासानुसार, आसाराम फसाळे गेल्या चार वर्षांपासून गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि लॉरेन्स गँगशी संबंधित होता. तो गँगच्या मास्टरमाईंड शुभम लोणकरच्या निर्देशानुसार शस्त्रांचा पुरवठा करत होता.

आधीच अटक केलेल्या चार आरोपींपैकी, आसाराम फसाळेची थेट ओळख स्वप्नील सकटशी होती. लोणकरच्या निर्देशानुसार फसाळेने सकटला शस्त्रे पुरवली, जी नंतर एका अज्ञात शूटरपर्यंत पोहोचली आणि त्यांचा वापर गोळीबाराच्या घटनेत केला गेला. पोलिसांना ही माहिती मिळाली आहे की, आसारामच्या टोळीशी संबंध असलेल्या इतर काही लोकांबद्दलही शंका आहे. पोलीस तपासत आहेत की, ते लोक लॉरेन्स गँगशी थेट संबंधित आहेत की नाही.

पोलिस कारवाई आणि पुढील पावले

पोलिस आता रणवीर आणि सलमानच्या नातेवाईकाला मिळालेल्या धमक्यांचा सखोल तपास करत आहेत. बँक व्यवहार, ईमेल, व्हॉइस नोट आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. तसेच, गोळीबार प्रकरणाशी याचा संबंध आहे की नाही, हे देखील तपासले जात आहे.

या तपासानंतर आरोपींवर आर्थिक फसवणूक, धमकी देणे आणि शस्त्रांचा गैरवापर यासारख्या कलमान्वये कारवाई होऊ शकते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा...

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!