T20 विश्वचषक 2026 : टीम इंडियासाठी (Team India) एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याचं ग्रुप ए मधील टीम इंडियाचा दुसरा सामना खेळणं अवघड वाटत आहे. 7 फेब्रुवारी रोजी यूएसए विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अभिषेक फलंदाजीत शून्यवाद बाद झाला आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करण्यासाठी सुद्धा उतरला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला पोटदुखीची समस्या जाणवल्यामुळे तो मैदानात आला नाही. मात्र आता टीम इंडिया 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबिया विरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याला सुद्धा अभिषेक शर्मा तब्येतीच्या कारणामुळे मुकू शकतो असं म्हटलं जातंय.
प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा उतरत नाही :
सूत्रांच्या माहितीनुसार अभिषेक शर्मा हा पोट दुखीचा कारणामुळे टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये भाग घेत नाहीये. अभिषेक शर्माला टी20 फॉरमॅटमध्ये सर्वात मोठा मॅच विनर म्हटलं जातं. अभिषेक शर्मा तब्येतीच्या कारणामुळे खेळू शकला नाही तर टीम इंडियाला प्लेईंग 11 मध्ये बदल करून ओपनिंगसाठी अन्य फलंदाजाला पाठवावं लागेल. मात्र दुसरीकडे जसप्रीत बुमराहबाबत टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. बुमराहची तब्येत ठीक नसल्याने तो मागील सामन्यात खेळला नव्हता. मात्र आता बुमराह फिट झाला असून तो नामिबिया विरुद्ध सामन्यात खेळेल.
वॉशिंगटन सुंदर संघासोबत जोडला :
वॉशिंगटन सुंदर मागील अनेक दिवसांपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत होता. मात्र आता तो एकदम फिट झाला असून टीम सोबत दिल्लीमध्ये जोडला गेलाय. तेव्हा जर अभिषेक शर्मा हा प्लेईंग 11 चा भाग बनला नाही तर ऑलराऊंडर वॉशिंगटन सुंदरला ओपनिंग फलंदाजीसाठी पाठवू शकतो. टेस्ट क्रिकेटमध्ये टीम मॅनेजमेंटने त्यांना नंबर 3 पर खेळलेलं आहे. अभिषेक शर्माच्या ऐवजी टीम मॅनेजमेंट संजू सॅमसनला सुद्धा संधी देऊ शकते. जर असं झालं तर मागच्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या संजू सॅमसनसाठी ही संघाकरता मोठी कामगिरी करून दाखवण्यासाठीची मोठी संधी असू शकते.
हेही वाचा : ईशान किशन ते मोहम्मद शमी, BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून ‘या’ 5 स्टार खेळाडूंना काढलं बाहेर
वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाचा संघ :
सूर्यकुमार यादव (कर्नाधर), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सिंग






























