Homeदेश-विदेशViral Menu photo 1897 Royal Dinner Global Taste of Indian Maharajas Of...

Viral Menu photo 1897 Royal Dinner Global Taste of Indian Maharajas Of Gwalior | सव्वाशे वर्षांपूर्वी भारतातील राजे


भारतीय रॉयल फूड: भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये डोकावलं असता, एक प्रचंड कमाल इतिहास डोळ्यांपुढं येतो. विविध काळ आणि संस्कृतींसह समुदायांचा प्रभाव देशातील खाद्यपदार्थांमध्ये सहजगत्या पाहायला मिळाले. अनेकदा या पदार्थांची पाळंमुळं समुदायातून तर काहींची थेट राजघराण्यांतून पाहायला मिळतात. अशाच राजघराण्यांमध्ये साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी नेमकी कोणती खाद्यसंस्कृती होती आणि तेव्हाचे राजे- महाराजे नेमकं काय आवडीनं खात होते याचीच झलक सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोतून पाहायला मिळत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

प्राथमिक माहितीनुसार व्हायरल होणारी ही अतिशय जुनी छायाचित्र 1897 मधील म्हणजेच 128 वर्षांपूर्वीची असून 31 जानेवारी 1897 या दिवशी बडोद्यातील महाराजांनी ग्वाल्हेरच्या सिंधीया महाराजांच्या सन्मानार्थ एका मेजवानीचं आयोजन केलं असता तेव्हा कोणकोणत्या पदार्थांची रेलचेल होती याचीच झलक पाहायला मिळत आहे. तेव्हाचा हा काळ ब्रिटीशांच्या अधिपत्याचा असून त्याच काळात भारतातील राजघराणी त्यांच्या आदरातिथ्यासाठी विशेष ओळखली जात होती.

(मुघलकालीन) दक्षिण आशियाई इतिहासकार नेहा वर्मानी यांना एका संशोधनादरम्यान त्या काळातील खाद्यसंस्कृतीवर भाष्य करणारा मेन्यू पाहायला मिळाला आणि त्यांनी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला. या मेन्यूमध्ये उल्लेख असणारे पदार्थ पाहता राजघराण्यांतील आदरातिथ्य आणि मेजवानी विशेष चर्चेत आल्या आहेत.

कुठं मिळाले हे ऐतिहासिक पुरावे?

व्हायरल होणाऱ्या साधारण शतकभराहूनही अधिक काळापूर्वीच्या या खाद्यपदार्थांमध्ये आढळणाऱ्या गोष्टी पाश्चिमात्य प्रभावही अधओरेखित करताना दिसल्या. जिथं फ्रेंच खाद्यसंस्कृतीचा प्रभाव प्रामुख्यानं दिसला. या तेव्हाच्या मेन्यूची सुरुवात होते ती म्हणजे बदाम कस्टर्डनं. त्यानंतर येणारे पदार्थ आहेत मेयोनेज सॉसमधील मासा, ट्रफल्सचं चिकन सूप, इतालवी स्टाईल मटन कटलेट. याशिवाय, मटरसोबतचे  रोस्टेड परट्रिज, डेमी ग्लास सॉसमध्ये आर्टिचोक, भात आणि भाजीचे काही पदार्थ ज्यांना फ्रेंच नावं देण्यात आली होती. याशिवाय जेवणात गोडाचा पदार्थ म्हणून क्रिम भरलेली सफरचंद आणि पिस्ता आईस्क्रीम अशा कमाल आणि वर्णन करताच डोळ्यांपुढं उभ्या राहणाऱ्या पदार्थांचा बेत होता.

कुठं आहेत हे पुरावे?

सध्याच्या घडीला हा मेन्यू अमेरिकेतील एका आर्काईव्हमध्ये सुरक्षित असून सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा सुरू आहे. 19 व्या शतकातील राजे- महाराजेसुद्धा इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावरीस पदार्थांना प्राधान्य देत होते ही बाब अनेकांना अवाक् करत आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते त्या काळातील राजघराण्यांमध्ये बहुतांशी आंतरराष्ट्रीय संस्कृतीचाही प्रभाव दिसून आला. हा फक्त एक मेन्यू नसून तेव्हाची विचारसरणी, मान, प्रतिष्ठा आणि संपूर्ण जगाशी असणारं नातं या गोष्टीसुद्धा अधोरेखित करत आहे.

(वरील माहिती एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मिळवण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!