Homeमनोरंजनश्रुती हासनने आई-वडिलांबद्दल सांगितलं मोठे रहस्य, 'कधी ते दोघे...'

श्रुती हासनने आई-वडिलांबद्दल सांगितलं मोठे रहस्य, ‘कधी ते दोघे…’


बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे जोरदार चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी कमल हासन यांची कन्या असलेल्या श्रुतीने अभिनय, गायन आणि संगीत या तिन्ही क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ स्टारकिड म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कष्टाच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केल्याचे पाहायला मिळते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

श्रुती हासनने तामिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून तिच्या चित्रपटांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. वडिलांच्या प्रसिद्धीवर अवलंबून न राहता ती दिवसरात्र मेहनत करत असल्याचे अनेकदा तिने स्पष्ट केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुती हासन हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले. या मुलाखतीत तिने आपले बालपण, आई-वडिलांचा विभक्त होण्याचा अनुभव, भाषिक संघर्ष, तसेच कुटुंबाची धार्मिक विचारसरणी यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्यामुळे ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियासोबत संवाद साधताना श्रुती हासन हिने सांगितले की, ती लहानपणापासून तामिळ आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये वाढली. ‘मुलांवर आईचा प्रभाव जास्त असतो. आमच्या घरी हिंदी आणि इंग्रजी भाषेत जास्त संवाद होत असे. माझी आई कायम काळजीत असायची की मी हिंदी शिकणार नाही आणि फक्त तामिळमध्येच अडकून राहीन. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे कुठेतरी माझी तामिळ भाषा थोडी कमकुवत झाली,’ असे तिने सांगितले.

आई-वडील विभक्त झाल्यानंतरचे अनुभव सांगताना श्रुती हासन भावूक झाली. ‘आई-वडील वेगळे झाल्यानंतर मी मुंबईला आले. माझे बालपण इतर मुलांसारखे सामान्य नव्हते. माझे आई-वडील कधीच माझ्या शाळेत येत नसत. त्यामुळे लहानपणापासूनच मला स्वतंत्रपणे अनेक गोष्टी हाताळायला शिकावे लागले,’ असे ती म्हणाली.

याच मुलाखतीत श्रुती हासन हिने आपल्या कुटुंबाच्या धार्मिक विचारांवरही मोकळेपणाने भाष्य केले. ‘मुळात आमचे कुटुंब धर्म, जात आणि देव यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही नास्तिक आहोत आणि धर्म नसलेल्या वातावरणात वाढलो आहोत. आमच्या घरात देवाचे फोटो किंवा धार्मिक प्रतीके नाहीत,’ असे तिने स्पष्ट केले.

वडिलांबद्दल बोलताना श्रुती हासन हिने सांगितले, ‘जर तुम्ही माझ्या वडिलांशी ज्योतिषशास्त्र किंवा अंधश्रद्धांबद्दल बोललात, तर ते तुम्हाला लगेच थांबवतील. ते खूप वास्तववादी आहेत आणि देव-देवतांवर विश्वास ठेवत नाहीत.’ तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

श्रुती हासन हिची ही स्पष्टवक्ती आणि प्रामाणिक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग असून तिच्या विचारांचे अनेक जण कौतुक करत आहेत. अभिनयासोबतच तिचे विचार आणि व्यक्तिमत्त्वही चाहत्यांना प्रभावित करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!