IND VS USA प्लेइंग 11 अंदाज : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) शनिवार 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत एकूण 20 संघांचा समावेश असून त्यांना सुरुवातीच्या ग्रुप स्टेज सामन्यांकरता चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचा आयोजन हे भारत आणि श्रीलंका देशांमध्ये केलं जात असून दोन्ही देशांच्या विविध शहरातील मैदानांवर हे सामने होणार आहेत. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार असून यात भारतीय संघ (Team India) यूएसए सोबत भिडणार आहे. तेव्हा या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार याबाबत जाणून घेऊयात.
कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये संधी?
मुंबईत शुक्रवारी भारत विरुद्ध यूएसए सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्याच्या प्लेईंग 11 बाबत काही हिंट्स दिले. यात त्याने ईशान किशनच्या फॉर्मचं कौतुक केलं, तसेच त्याची प्लेईंग 11 मध्ये निवड झाली तर तो वर्ल्ड कपमध्ये संघाच्या टॉप ऑर्डर मध्येच खेळेल असं सांगितलं. संजू सॅमसनचा फॉर्म पाहता त्याला यूएसए विरुद्ध वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे ओपनिंग जोडी म्हणून उतरण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादव आणि चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा खेळायला येऊ शकतो.
ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांची प्लेईंग 11 मध्ये वर्णी लागणं हे जवळपास निश्चित आहे. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव किंवा वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळू शकते.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : हर्षित राणा टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर! ‘या’ स्टार गोलंदाजाला मिळाली संधी
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 :
इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्ंधर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
यूएसएची संभाव्य प्लेईंग 11 :
मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रिस गौस (विकेटकीपर), सैतेजा मुक्कामल्ला, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, अली खान, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर.
टीम इंडियाचं ग्रुप स्टेज सामन्यांसाठीचं वेळापत्रक :
7 फेब्रुवारी भारत विरुद्ध यूएसए
12 फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया
15 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान
18 फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड






























