Homeमहाराष्ट्रGold and silver prices is directly impacting Paithani sarees know current prices...

Gold and silver prices is directly impacting Paithani sarees know current prices Marathi News | सोनं-चांदीच्या दरवाढीचा थेट पैठणीवर परिणाम, किती झालेयत दर? जाणून घ्या!


पैठणी साड्यांची किंमत: राज्यातच नव्हे तर देशभरात ओळख असलेली येवल्याची पैठणी सध्या अडचणीत सापडली आहे. सोनं आणि चांदीच्या दरवाढीचा थेट फटका पैठणी उत्पादनाला बसत असून, जरीचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. यामुळे पैठणी महाग होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पैठणी साडी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. ही साडी देशभरात प्रसिद्ध आहे आणि सण-उत्सव किंवा विवाहसोहळ्यात महिलांची पहिली निवड असते. या साडीवर मोराच्या आकाराची सुंदर नक्षीकाम केले जाते, ज्यामुळे ती आणखी आकर्षक दिसते. सोने आणि चांदीच्या जरीचा वापर करून हातमागावर ही साडी विणली जाते. यामुळे साडी नेसलेली स्त्री अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. पैठणी ही जड आणि मौल्यवान साड्यांमध्ये गणली जाते, म्हणूनच ती महाराष्ट्राची खास ओळख म्हणून ओळखली जाते.

येवला हे नाशिकजवळील गाव पैठणी साड्यांचे मुख्य केंद्र आहे. इथे अनेक महिला विशेषतः पैठणी खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, सध्या येवल्यातील पैठणी उद्योग संकटात सापडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोने आणि चांदीच्या किंमतीत झालेली मोठी वाढ. खऱ्या पैठणीच्या पदरासाठी सोने-चांदीच्या जरीचा वापर होतो, ज्यामुळे उत्पादन खर्च खूप वाढला आहे. परिणामी, पैठणी साड्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी चांदीच्या जरीची किंमत प्रति किलो 3500 ते 3600 रुपये होती, परंतु आता ती 6000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीमुळे पैठणी उत्पादनाचा खर्च दुप्पट झाला आहे. याचा थेट परिणाम साड्यांच्या विक्रीवर होत आहे. महागाईमुळे ग्राहक महागड्या पैठण्या खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यामुळे विक्री कमी झाली आहे

येवल्यात शेकडो कारागीर पिढ्यान्पिढ्या पैठणी विणण्याच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. ते करघ्यावर दिवस-रात्र मेहनत करतात. मात्र, साड्यांच्या किंमती वाढल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. परिणामी, कारागिरांच्या उत्पन्नात घट झाली आहे. काम असले तरी विक्री कमी असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून महिला येवल्यात पैठणी खरेदीसाठी येतात. मात्र, आता किंमती वाढल्याने त्यांचा उत्साह कमी झाला आहे. गृहिणींना महाग पैठणी घेणे परवडत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. एकूणच, सोने-चांदीच्या दरवाढीमुळे पैठणी उद्योगावर मोठा फटका बसला असून, यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!