HomeमनोरंजनHow To Download Vehicle RC Book Onlines Via Vahan 4.0 App Step...

How To Download Vehicle RC Book Onlines Via Vahan 4.0 App Step by Step Process in Marathi | RC साठी आता RTO च्या फेऱ्यांची गरज नाही; ‘या’ अ‍ॅपवरुन सहज मिळवा डिजिटल Documents


आरसी बुक ऑनलाईन कसे डाउनलोड करावे: आजकाल गाडीची RC म्हणजेच Registration Certificate हरवणे, फाटणे किंवा खराब होणे ही सामान्य समस्या बनली आहे. अजूनही अनेक राज्यांमध्ये स्मार्ट कार्डऐवजी कागदी RC दिली जाते. अशा वेळी पोलिस तपासणी किंवा इतर कामांसाठी अडचण निर्माण होते. मात्र आता यासाठी RTO ऑफिसच्या रांगा लावण्याची गरज नाही. भारत सरकारने सुरू केलेल्या VAHAN 4.0 प्रणालीमुळे घरबसल्या काही मिनिटांत RC ची डिजिटल कॉपी मिळवता येते. ही सुविधा देशभर लागू असल्याने वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

VAHAN 4.0 म्हणजे काय?
VAHAN 4.0 हा भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने विकसित केलेला डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या प्रणालीद्वारे वाहन नोंदणी आणि त्यासंबंधित सर्व माहिती एका सेंट्रल डेटाबेसमध्ये साठवली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतील RTO मधील माहिती सहज शेअर होते. पारदर्शकता वाढते आणि नागरिकांना सेवा लवकर मिळतात.

VAHAN 4.0 वर कोणती कामे करता येतात?
या पोर्टलचा वापर केवळ RC डाउनलोडसाठीच नाही तर अनेक कामांसाठी होतो. वाहन रजिस्ट्रेशन, मालकी हक्क बदल, रोड टॅक्स भरणे, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट काढणे तसेच वाहन कर्जाशी संबंधित माहिती जोडणे किंवा काढणे ही कामे VAHAN 4.0 द्वारे करता येतात. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध होतात.

RC ची डिजिटल कॉपी कशी डाउनलोड कराल?
RC हरवली असल्यास किंवा तातडीने गरज असल्यास VAHAN 4.0 वरून तिची डिजिटल प्रत मिळवता येते. यासाठी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर RC Download असे सर्च करा. सर्च रिझल्टमध्ये अधिकृत VAHAN 4.0 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर वाहनाचा Registration Number आणि Chassis Number चे शेवटचे 5 अंक टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकताच RC PDF स्वरूपात डाउनलोड करता येते.

Digilocker वरूनही मिळते RC
सरकारच्या Digilocker अ‍ॅपमुळेही RC सहज मिळू शकते. Digilocker अ‍ॅप डाउनलोड करून लॉगइन करा. त्यानंतर Vehicle Registration हा पर्याय निवडा आणि आपले राज्य सिलेक्ट करा. Registration Number आणि Chassis Number टाकल्यावर RC ची डिजिटल कॉपी फोनमध्ये सेव्ह होते.

हे ही वाचा: HSRP Number Plate: Deadline संपली! अजूनही नंबर प्लेट नाही? मग अडचणीत येऊ शकता; किती भरावा लागेल दंड? पहा…

डिजिटल RC चे फायदे
डिजिटल RC ही कायदेशीरित्या वैध असते. ती ट्रॅफिक तपासणी, विमा क्लेम किंवा इतर शासकीय कामांसाठी वापरता येते. कागदपत्रे सांभाळण्याचा त्रास कमी होतो आणि वेळेचीही बचत होते. VAHAN 4.0 मुळे वाहनधारकांसाठी सेवा अधिक सोप्या आणि वेगवान झाल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!