Homeमनोरंजनबाजारातील कृत्रिम काजळ तुमच्या मुलांसाठी ठरतयं घातक; बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात? पहा...

बाजारातील कृत्रिम काजळ तुमच्या मुलांसाठी ठरतयं घातक; बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात? पहा…


बाळ काळजी टिप्स: पूर्वी लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ लावणे ही एक सामान्य आणि शुभ परंपरा मानली जात होती. काजळामुळे वाईट नजर लागत नाही, मुलं अधिक गोड दिसतात आणि नशीब चांगले राहते, अशी अनेकांची समजूत होती. पण काळ बदलला आहे. आज जे काजळ बाजारात मिळते, ते पूर्वीसारखे नैसर्गिक राहिलेले नाही. त्यामुळे ही परंपरा आता हळूहळू मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारतभरातून अलीकडे काही धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. काजळ लावल्यानंतर अनेक मुलांच्या डोळ्यांना जळजळ, सूज, लालसरपणा आणि संसर्ग झाल्याचे आढळून आले. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून डॉक्टरांनीही गंभीर इशारा दिला आहे.

बाजारातील काजळ किती सुरक्षित आहे?
बालरोगतज्ज्ञांच्या मते, सध्या उपलब्ध असलेले बहुतांश काजळ शुद्ध नसते. त्यामध्ये रसायने, कार्बन, शिसे आणि इतर घातक घटक मिसळलेले असतात. हे घटक प्रौढांसाठीही हानिकारक ठरू शकतात, तर लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांसाठी ते अधिक धोकादायक आहेत.

बालरोगतज्ज्ञांच्या  सांगतात की नवजात मुलांना आणि लहान मुलांच्या डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय संवेदनशील असते. थोड्याशा रासायनिक संपर्कामुळेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतीही खात्री नसलेले काजळ वापरणे टाळावे.

काजळामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या
रासायनिक काजळामुळे डोळ्यांतून पाणी येणे, सतत डोळे चोळणे, खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा उपचार आणि औषधांची गरज भासते.

दीर्घकाळ काजळ वापरल्यास डोळ्याच्या पटलावर परिणाम होऊन दृष्टी कमजोर होण्याचा धोका असतो. त्यामुळे डॉक्टर कोणत्याही प्रकारचे काजळ मुलांच्या डोळ्यांत लावण्याचा सल्ला देत नाहीत.

एक वर्षाखालील मुलांसाठी खास इशारा
डॉक्टरांच्या मते 1 वर्षाखालील मुलांच्या डोळ्यांत काजळ अजिबात लावू नये. फारच आवश्यक वाटल्यास बाजारातील काजळ पूर्णपणे टाळावे. काजळामुळे अॅलर्जी, जंतुसंसर्ग, पापण्यांवर गाठी येणे आणि डोळ्यांच्या नसांना सूज येण्याचा धोका असतो.

हे ही वाचाः जेवण शिजवताना ‘या’ चुका करणे टाळा, नाहीतर तुम्हीच तुमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आणाल!

डोळ्यांची स्वच्छता कशी ठेवावी?
डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी फक्त स्वच्छ कपडा आणि उकळून थंड केलेले पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डोळ्यांत लालसरपणा, सूज किंवा जळजळ दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंपरेपेक्षा विज्ञान महत्त्वाचे असून, मुलांच्या डोळ्यांशी कोणताही प्रयोग भविष्यात गंभीर परिणाम करू शकतो, असा इशाराही तज्ज्ञ देत आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!