Homeदेश-विदेशउद्धव ठाकरे शिवसेनेची टीका पीएम मोदी भारत यूएस व्यापार कराराचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर...

उद्धव ठाकरे शिवसेनेची टीका पीएम मोदी भारत यूएस व्यापार कराराचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख


भारत यूएस व्यापार कराराचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम: “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी व्यापार करार झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशात उत्सव सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जग जिंकल्याच्या थाटात जाहीर केले की, ‘‘भारताच्या 140 कोटी जनतेसाठी ही शानदार घोषणा आहे. दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि मोठे लोकशाही देश एकत्र येतात तेव्हा लोकांचा फायदाच फायदा होतो.’’ मोदी यांनी स्वतःच जाहीर केले की, ‘‘भारत ही मोठी अर्थव्यवस्था आहे.’’ मात्र 1 तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘पोकळ-फुसका’ अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजार कोसळून धराशायी झाला होता आणि भारतीय अर्थव्यवस्थेची हवाच निघाली होती,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. “ज्या प्रेसिडंट ट्रम्प यांच्याशी व्यापार करार झाला त्या अमेरिकेच्या डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया 92 पर्यंत घसरला आहे. त्यावर मोदी यांचे अंधभक्त म्हणतात, ‘‘इथे डॉलर्सची उठाठेव कशाला करता? भारतात काय डॉलरने व्यवहार होतो?’’ हे विधान म्हणजे ‘जसा राजा तशी प्रजा’ या पठडीतले आहे. भारतीय रुपयाचे इतके अवमूल्यन कधीच झाले नव्हते, पण मोदी व त्यांचे लोक प्रेसिडंट ट्रम्प यांच्याशी व्यापार होत आहे या आनंदात मशगुल आहेत. प्रेसिडंट ट्रम्प हे मोदींचा नवा देव आहे,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

…मग भारतीय शेतकरी व शेतमजुरांनी काय करायचे? कसे जगायचे?

“प्रत्यक्षात ट्रम्प यांनी भारताचा घात केला आहे. ट्रम्प यांच्याशी झालेला व्यापार करार म्हणजे देश अमेरिकेच्या पायाशी गहाण टाकल्याचा पुरावा आहे. राहुल गांधी यांनी बेडरपणे सांगितले की, ‘‘पंतप्रधान मोदी प्रचंड घाबरले आहेत. त्यांच्यावर प्रेसिडंट ट्रम्प यांचा प्रचंड दबाव आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर सही करून मोदींनी देशाला विकले आहे.’’ भारताने आता अमेरिकेच्या सर्व अटी-शर्ती मान्य केल्या व त्या बदल्यात अमेरिकेने भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ 18 टक्क्यांवर येईल. मुळात भारतावर आधी 3.31 टक्के टॅरिफ होते, ते आता 18 टक्के झाले आहे. अर्थात या व्यापार करारात काय आहे? भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, तर फक्त अमेरिकेकडून तेल खरेदी करेल. अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनांवर व अन्य मालांवर भारत टॅरिफ लावणार नाही. जवळ जवळ ‘शून्य’ टॅक्स असेल. त्यामुळे भारत देशातील शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे. भारतीय शेतकऱ्यांवर हा सगळ्यात मोठा आघात आहे. प्रेसिडंट ट्रम्प यांनी मोदींचा हवाला देत सांगितले आहे की, भारत अमेरिकेकडून 500 बिलियन डॉलर्सची तेल खरेदी करेल. कृषी उत्पादने, कोळसा, तंत्रज्ञानाची खरेदी विनाटॅक्स करेल. अमेरिकेबरोबरचा हा करार म्हणजे अमेरिकेला देशाचे सार्वभौमत्व विकल्यासारखेच आहे. अमेरिकेचा कापूस, दूध, दुधाचे पदार्थ, म्हणजे दही, चीज, डाळी, सोयाबीन, मका, बदाम, अक्रोड, पिस्ता, भाज्या, फळे, फुले वगैरे खुलेआम भारतीय बाजारात विक्रीस येतील. या विक्रीवर कोणताही ‘टॅक्स’ नसल्याने भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी भावात अमेरिकेचा माल विकला जाईल. मग भारतीय शेतकरी व शेतमजुरांनी काय करायचे? कसे जगायचे?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

भारताचे पंतप्रधान आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट?

“भारतातील अमेरिका कृषी व्यापार आधी 50 बिलियन अमेरिकी डॉलर होता. तो आता 500 बिलियन डॉलर इतका होईल. भारतीय शेतकऱ्यांचे रक्त व घामाचे शोषण करून अमेरिकेतील शेतकऱ्यांना हा लाभ होईल आणि त्याला भारताच्या पंतप्रधानांनी मान्यता दिली. लाखो भारतीय शेतकरी, शेतमजूर या करारात ठार मरणार आहेत व मोदी या कराराचा विजय उत्सव साजरा करीत आहेत. शेतकरी, छोटे उद्योजक, कुटीर उद्योजकांना रस्त्यावर आणणारा व्यापार करार पंतप्रधान मोदी यांनी केला. अमेरिकेतील शेतकरी भारतीय शेतकऱ्यांचे रक्त शोषून आता मालामाल होईल. अमेरिकेतील शेतकऱ्यांचे हित प्रेसिडंट ट्रम्प यांनी पाहिले व अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी त्यांनी भारताला गुलाम बनवले. ज्या देशातला शेतकरी रोज कर्जात बुडून आत्महत्या करतोय, त्या देशातले सरकार परदेशी कृषी उत्पादनांसाठी ‘रेड कार्पेट’ टाकत आहे. झिरो टॅरिफचा सरळ अर्थ इतकाच की, अमेरिकेतील सबसिडीवाले स्वस्त व कुजके धान्य भारतात भरभरून येईल व भल्या पहाटे कृषी बाजारात ढकलले जाईल, ही भारतीय शेतकऱ्यांशी केलेली बेइमानी आहे. मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला हा व्यापार करार नाहीच, तर सरळ सरळ देशाच्या अन्नदात्याविरुद्ध केलेली युद्धाची घोषणा आहे. देशातील शेतकरी व कष्टकऱ्यांनी आता एकजूट होऊन त्याबद्दल जाब विचारावा लागेल की, प्रधानमंत्री मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट?” असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

मोदींनी एक क्षणही पदावर राहू नये

“भारताच्या पंतप्रधानांनी प्रेसिडंट ट्रम्प यांच्या पुढे पत्करलेली ही शरणागती आहे. राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘मोदी घाबरले आहेत. हा व्यापार करार चार महिन्यांपासून थांबला होता. कोणत्या तरी रहस्यमय कारणाने घाईघाईने मोदी यांनी काल संध्याकाळी या करारावर सही केली. मोदींवर भयंकर दबाव आहे. मोदींचा मुखवटा आता गळून पडेल. आमच्या पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेत गौतम अदानीवर एक खटला सुरू आहे. ‘एपस्टीन फाईल्स’मधला बराच स्फोटक माल अद्याप बाहेर यायचा आहे.’’ राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या शरणागतीची कारणे सांगून टाकली. भाजप कसला उत्सव साजरा करीत आहे? मोदी सरकारने अमेरिकेच्या पायाशी भारतीय शेतकऱ्यांचे हित व राष्ट्राचे सार्वभौमत्व गहाण टाकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आता एक क्षणही पदावर राहू नये!” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!