Homeदेश-विदेशरायचूर कर्नाटकात कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून गर्भवती महिलेची हत्या

रायचूर कर्नाटकात कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून गर्भवती महिलेची हत्या


सासऱ्याकडून गर्भवती महिलेची हत्या: कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सिरवार तालुक्यातील चिक्कहनगी गावात एका गरोदर महिलेची हत्या करण्यात आली आहे. हादरवणारी बाब म्हणजे ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असून पाच महिन्यांच्या गरोदर महिलेला तिच्या सासऱ्यांनीच संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 28 जानेवारी रोजी घडली आहे. या घटनेची माहिती पंचक्रोशीमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली असून हे गाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मयत महिलेचं नाव रेखा नागराज असून ती 24 वर्षांची आहे. रेखा पहिल्यांदाच आई होणार होती. त्यापूर्वीच तिच्या सासऱ्यांनी तिची हत्या केली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रक्तबंबाळ अवस्थेत घराच्या दारातून बाहेर आली अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 50 वर्षांचा असून त्याचं नाव सिद्दप्पा असं आहे. घरात कोणी नसताना सिद्दप्पाने रेखावर चाकूने हल्ला केला. सासऱ्याने सुनेच्या मान आणि चेहऱ्यावर चाकूने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यानंतर सिद्दप्पा घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमा झालेली रेखा रक्ताच्या थारोळ्यात वेदनेने विव्हळत होती. काहीवेळ बसून राहिल्यानंतर ती स्वत: धडपडत मदतीसाठी ओरडाओरड करत घराच्या मुख्य दारातून बाहेर आली. शेजारी तिच्या मदतीला पोहचण्याआधीच ती खाली कोसळली. ती घराच्या व्हरांड्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला, असे गावकऱ्यांनी सांगितले. जीव वाचावा म्हणून धडपडणाऱ्या जखमी रेखा रक्तबंबाळ अवस्थेत घरातून बाहेर येत असल्याचं दृश्य पाहणाऱ्यांना गावकऱ्यांना धक्काच बसला. हे दुश्य अजूनही लोकांच्या डोळ्यासमोर जात नाहीये.

नेमकं वादाचं कारण काय?

तीन वर्षांपूर्वी रेखाचं आरोपी सिद्दपाचा मुलगा नागराजशी लग्न झाले होते. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला रेखा आणि तिच्या सासरच्या मंडळींमधील संबंध सलोख्याचे होते. मात्र, लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांच्यात खटके उडू लागले. प्रामुख्याने शेती आणि घरातील कामांवरून सुनेचे सासरच्या मंडळींशी वाद होऊ लागले. सततच्या भांडणांमुळे, रेखा आणि नागराज यापूर्वी हिरेहनगी गावात विभक्त संसार थाटून राहिले. रेखा गर्भवती झाल्यावर, कुटुंबाने एकत्र राहावे असे सांगून तिच्या सासरच्या मंडळींनी त्या दोघांना चिक्कहनगी येथे मूळ गावी परत येण्यास सांगितले. त्याप्रमाणे गरोदर रेखा पतीसहीत सासरच्या मूळ घरी परतली. मात्र पुन्हा आधीसारखेच वाद होऊ लागले आणि भांडणं रोजची झाली. 28 जानेवारी रोजी झालेला असाच एक वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर हिंसक भांडणात झाले. त्यातूनच सासऱ्याने सुनेवर हा प्राणघातक हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.

मयत महिलेच्या पालकांनीच नोंदवली तक्रार

मुलीवर तिच्या सासऱ्यांनीच हल्ला केल्याची बातमी मिळाल्यानंतर रेखाचे पालक तातडीने तिच्या सासरी पोहोचले. रेखाच्या पालकांनीच आरोपी सिद्दप्पाविरुद्ध कवितळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सिद्दप्पा, तसेच रेखाचा पती नागराज आणि सासू बसम्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिद्दप्पाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. पुढील तपासानंतर हत्येमागील नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!