Homeमनोरंजनदिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये, गतविजेता मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर

दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये, गतविजेता मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर


WPL 2026: विमेन्स प्रीमियर लीग 2026 चा ग्रुप स्टेज अखेर संपला असून प्लेऑफचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. रविवार, 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा 5 विकेट्सनी पराभव करत पुढील फेरीत आपली जागा निश्चित केली. या विजयामुळे दिल्लीने सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. याआधीच्या प्रत्येक हंगामात दिल्ली संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला असला तरी अजूनही जेतेपद त्यांना मिळवता आलेले नाही. यंदा मात्र संघ आत्मविश्वासात दिसत असून चाहत्यांना नव्या आशा मिळाल्या आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यांनी स्पर्धेची रंगत अधिकच वाढवली. दिल्लीच्या विजयाचा परिणाम इतर संघांवरही झाला असून काही मोठी नावं प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे आता पुढील सामने अधिक चुरशीचे होणार आहेत.

दिल्लीच्या विजयाचा इतर संघांवर परिणाम
दिल्ली कॅपिटल्सच्या या महत्त्वाच्या विजयामुळे यूपी वॉरियर्ससोबतच गतविजेत्या मुंबई इंडियन्सनाही मोठा धक्का बसला. मुंबई संघाचं भवितव्य दिल्लीच्या निकालावर अवलंबून होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला दिल्लीचा पराभव आवश्यक होता, मात्र तसं घडलं नाही. परिणामी मुंबई इंडियन्स यंदाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही.

यूपी वॉरियर्ससाठीही हा सामना ‘करा किंवा मरा’ असा होता. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्यांचा प्रवास ग्रुप स्टेजपुरताच मर्यादित राहिला.

एलिमिनेटरमध्ये दिल्ली विरुद्ध गुजरात
पॉइंट्स टेबलमध्ये 3 क्रमांकावर राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आता एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सशी होणार आहे. हा सामना मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आधीच पोहोचली आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील RCB संघाने 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवत थेट फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

हे ही वाचा: वाह! काय Attitude आहे… अंडर 19 सामन्यानंतरच्या ‘त्या’ घटनेने वेधलं लक्ष; पाकिस्तानी खेळाडू समोर येताच…

जेमिमाची नेतृत्वपूर्ण खेळी
यूपी वॉरियर्सविरुद्धच्या निर्णायक सामन्यात दिल्लीसाठी जेमिमा रोड्रिगेजने मोलाची भूमिका बजावली. यूपी संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त 122 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने संयम राखत लक्ष्य गाठलं.

जेमिमाने 18 चेंडूत नाबाद 34 धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. तिच्यासोबत लॉरा वोल्वार्ड्टने 47 धावांची स्थिर खेळी साकारली. गोलंदाजीत अनुभवी मॅरिझान कॅपने 3 विकेट्स घेत सामन्याचा प्रवाह बदलला आणि तिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!