HomeमनोरंजनWhen and Where to watch IND vs PAK U19 Live Streaming Match...

When and Where to watch IND vs PAK U19 Live Streaming Match For Free | IND vs PAK: आज रंगणार भारत-पाकिस्तानचा महामुकाबला! सामना तुम्ही कुठे बघू शकता फ्रीमध्ये LIVE?


IND vs PAK U19 लाइव्ह कधी आणि कुठे पहावे: अंडर-19 विश्वचषक 2026 च्या सुपर सिक्स फेरीत आज क्रिकेटप्रेमींचं लक्ष एका मोठ्या सामन्याकडे लागलं आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना आज झिम्बाब्वेतील बुलावायोच्या क्विन्स स्पोर्ट्स क्लबवर होणार आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना अत्यंत निर्णायक मानला जात आहे. या स्पर्धेत भारतीय अंडर-19 संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजपासून सुपर सिक्सपर्यंत भारताने झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडसारख्या संघांना एकतर्फी पराभूत केले आहे. सध्या भारताचा नेट रनरेट +3.337 इतका मजबूत असून, त्यामुळे सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. आजचा विजय भारताला गुणतालिकेत आणखी भक्कम स्थितीत नेऊ शकतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ सामना

दुसरीकडे पाकिस्तानसाठी हा सामना अक्षरशः व्हर्च्युअल नॉकआउट आहे. मागील सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय मिळवला असला, तरी त्यांचा रनरेट भारताच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला केवळ विजयच नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे.

रंगणार जोरदार लढत

भारतीय संघाची फलंदाजी सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या खांद्यावर आहे. वैभवने आपल्या आक्रमक खेळीने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला आहे.

पाकिस्तानची खरी ताकद म्हणजे त्यांची वेगवान गोलंदाजी. अली रझा आतापर्यंत 12 बळी घेऊन स्पर्धेतील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. भारतीय टॉप ऑर्डरसाठी तो मोठं आव्हान ठरू शकतो. याशिवाय, अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या 191 धावांच्या पराभवाचा बदला घेण्याची ही भारतासाठी संधी आहे.

लाईव्ह सामना मोफत कसा पाहाल?

हा बहुप्रतिक्षित सामना आज, 1 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.

नाणेफेक: दुपारी 12:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)

सामन्याची सुरुवात: दुपारी 1:00 वाजता

भारतामध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहता येईल.

डिजिटल प्रेक्षकांसाठी सामना JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!