Homeदेश-विदेशJeffrey Epstein ने नवीन फोटो काढले माजी Prince Andrew UK रॉयल फॅमिली...

Jeffrey Epstein ने नवीन फोटो काढले माजी Prince Andrew UK रॉयल फॅमिली संशयास्पद फोटो


एपस्टाईन फाइल्स फोटो: अमेरिकी न्याय व्यवस्थेनं मागील काही दिवसांपूर्वीच जारी केलेल्या कागदपत्र आणि पुराव्यांनी नुकतंच काही पुरावे सादर करत सर्वांचच लक्ष वेधलं. असंख्य चर्चांना यामुळं उधाण आलं होतं.  त्यातच आता आणखी काही खळबळजनक पुरावे समोर आले असून, यामध्ये थेट ब्रिटनच्या राजघराण्यातील एका व्यक्तीचंही नाव समोर आलं आहे. नव्या पुराव्यांनुसार ब्रिटनच्या राजघराण्यातून काही दिवसांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आलेल्या आणि तत्कालीन सदस्य प्रिन्स अँड्र्यू अल्बर्ट क्रिस्टीयन एडवर्ड माऊंटबेटन विंडसर यांचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नव्यानं जारी करण्यात आलेल्या पुराव्यांनुसार ब्रिटनचे (पूर्वाश्रमीचे) प्रिन्स अँड्र्यू यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. ही तिच व्यक्ती आहे ज्यांना काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या राजघराण्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. शिवाय त्यांच्या नावापुढं लावला जाणारा ‘प्रिन्स’ आणि ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ हा किताबही काढून घेण्यात आला होता.

नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये काय दिसतंय?

शुक्रवारी नव्यानं जारी करण्यात आलेल्या फोटोंमध्ये अँड्र्यू डेनिम आणि पांढऱ्या पोलो टी- शर्टमध्ये दिसत आहेत. एका छायाचित्रामध्ये त्यांनी चेहरा लपवलेल्या एका मुलीच्या पोटावर हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये थेट कॅमेरामध्ये पाहताना दिसत आहेत. या छायाचित्रांमध्ये मुलगी नेमकी कोण आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. इतकंच नव्हे तर हा फोटो नेमका कुठं टीपण्यात आला आहे हेसुद्धा कळू शकलेलं नाही.

30 लाखांहून अधिक पुराव्यांमधून हा एक फोटो…

हे छायाचित्र त्याच 30 लाख पुराव्यांपैकी एक असून, या पुराव्यांमध्ये 2000  व्हिडीओ आणि 1.80 लाख छायाचित्रांचा समावेश आहे. हे सर्व पुरावे एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी अॅक्टअंतर्गत जाहीर करण्यात आले. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीनंतरच हा कायदा लागू करण्यात आला होता.

एपस्टीनचा अँड्रूय़ू यांच्याशी संपर्क कसा आला?

जेफ्री एपस्टीन फाईल्समधून समोर आलेल्या माहितीनुसार त्यानं 2010 मध्ये अँड्र्यूची भेट एका रशियन महिलेशी घडवून आणली होती. ती महिला ‘चतुर आणि सुंदर’ असल्याचं तो म्हणाला होता. ईमेल रेकॉर्डनुसार या दोघांमध्ये बकिंघम पॅलेसमध्ये जेवणादरम्यान याबाबतची चर्चा झाली होती. ही भेट कधी झाली की नाही हे मात्र अधिकृतपणे समोर येऊ शकलेलं नाही.

जेफ्री एपस्टाईन कोण होते?

जेफ्री एपस्टीन एक अमेरिकी गुंतवणूकदार असून, जो त्यानंतर मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणप्रकरणी एक मुख्य आरोपी ठरला. एपस्टीनवर अप्लवयीन मुलींचं शोषण, तस्करी असे आरोप करण्यात आले असू, त्याच्या अमेरिका, कॅरेबियन आणि युरोपातील आलिशान घरी अनेक बडे नेते, उद्योगपती आणि प्रमुख व्यक्तीमत्त्वाची हजेरी असत असंही म्हटलं गेलं. 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या कारागृहात एपस्टीनचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता, अधिकृत अहवालात ही आत्महत्या म्हटल्याचं सांगण्यात आलं होतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!