Homeमनोरंजनपरिणीती चोप्रा अन् सायना नेहवालचा Follow- Unfollow गेम; 'मी कधीच तिला...' बेडमिंटनपटूचं...

परिणीती चोप्रा अन् सायना नेहवालचा Follow- Unfollow गेम; ‘मी कधीच तिला…’ बेडमिंटनपटूचं वक्तव्य चर्चेत


परिणीती चोप्रा: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सध्या सोशल मीडियामुळे चर्चेत आल्या आहेत. दोघींनी एकत्र काम केले असले तरी आता त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण सोशल मीडियावर परिणीतीने सायनाला अनफॉलो केल्याचे समोर आले आहे. चित्रपटांमुळे नाही तर अशा एका छोट्या पण लक्षवेधी कारणामुळे हे नावं चर्चेत आली आहेत. चाहत्यांमध्ये यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

परिणीती चोप्रा काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. 2024 मध्ये आलेल्या अमर सिंह चमकिला या चित्रपटात ती शेवटची झळकली होती. तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट म्हणजे सायना नेहवालची बायोपिक. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात परिणीतीने सायनाची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.

सायना-परिणितीने एपिसोड अनफॉलो केला

अलीकडे चाहत्यांनी सोशल मीडिया अकाउंट्स तपासल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. सायना नेहवाल अजूनही परिणीती चोप्राला फॉलो करते, मात्र परिणीती सायनाला फॉलो करत नाही. यामुळे दोघींमध्ये वैयक्तिक मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी याला गैरसमज म्हटलं, तर काहींनी नात्यात दुरावा असल्याचा अंदाज लावला.

या चर्चांवर स्वतः सायना नेहवालने प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्टमध्ये तिला थेट याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर सायनाने अगदी साध्या शब्दांत उत्तर दिलं. तिने सांगितलं की, परिणीतीने तिला अनफॉलो केलं आहे हे तिला मुळीच माहिती नव्हतं. तिचं आयुष्य सराव, स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये इतकं व्यस्त असतं की अशा गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही, असं तिने स्पष्ट केलं.

मैत्रीपेक्षा कामापुरताच संबंध

सायनाने पुढे आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली. तिच्या आणि परिणीतीमध्ये कधीही खास मैत्री नव्हती, असं ती म्हणाली. बायोपिकसाठी जेव्हा परिणीतीने तिची भेट घेतली, तेव्हा झालेलं बोलणं पूर्णपणे कामापुरतंच होतं. सायनाचं आयुष्य, संघर्ष आणि प्रवास समजून घेण्यासाठी त्या भेटी झाल्या, पण त्यातून वैयक्तिक नातं तयार झालं नाही.

हे ही वाचा: मोठे स्टार्स गप्प होते पण ती… अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी ‘ही’ टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण?

सायनाच्या मते, दोघींना एकत्र वेळ घालवण्याच्या संधी फारच कमी मिळाल्या. त्या कधीही लंच किंवा डिनरसाठी एकत्र गेल्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर फॉलो किंवा अनफॉलो याला फारसं महत्त्व देऊ नये, असा अप्रत्यक्ष संदेशही सायनाने दिला. सध्या तरी या प्रकरणामुळे कोणताही वाद नसून, हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित असल्याचं स्पष्ट होत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

दिव्यांगांवर टिप्पणी- कॉमेडियन समय रैनावर 3 लाख दंड:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्ही स्वातंत्र्य दिले जेणेकरून...

0
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर...
spot_img

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
error: Content is protected !!